सटाण्यातील वादग्रस्त भिंत अखेर उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:32 PM2021-05-28T17:32:44+5:302021-05-28T17:32:54+5:30

सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भागात सोसायटीच्या कॉलनी रोडवर अतिक्रमण करून बांधलेली भिंत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे १२ मीटर रुंदीचा रस्ता नागरिकांसाठी खुला झाला आहे.

The controversial wall in Satana finally collapsed | सटाण्यातील वादग्रस्त भिंत अखेर उद्ध्वस्त

सटाण्यातील वादग्रस्त भिंत अखेर उद्ध्वस्त

Next

सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भागात सोसायटीच्या कॉलनी रोडवर अतिक्रमण करून बांधलेली भिंत नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे १२ मीटर रुंदीचा रस्ता नागरिकांसाठी खुला झाला आहे.
सुमारे ४ वर्षांपूर्वी सटाणा शहरातील काही नागरिकांना एकत्र येऊन श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेची नोंदणी केली. मालेगाव रोडवर जागा घेऊन बंगले बांधले व मध्य भागातून कॉलनी रोड ठेवला. पूर्वी त्या परिसरात आजूबाजूला शेती असल्यामुळे कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर भिंत बांधून रोड बंद केला गेला. मात्र, आता त्या परिसरात प्लॉट पडल्यामुळे कॉलनी रोड वापरण्याची गरज निर्माण झाली. तेव्हा श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेने कॉलनी रोड खासगी आहे. नगर परिषदेचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका घेतली व रस्त्यावर बांधलेली भिंत काढून घेण्यास नकार दिला होता. काही नागरिक शासनाकडे गेले, तेव्हा नगरविकास राज्यमंत्री यांनीही सदरची भिंत पाडून टाकण्याचा आदेश दिला. तरीही संस्थेने भिंत काढली नाही. त्यामुळे नगर परिषदेने संस्थेला भिंत काढून घेण्याबाबत नोटीस बजावली. तेव्हा संस्थेने नोटीस बेकायदेशीर आहे, असे सांगून न्यायालयात धाव घेतली व तात्पुरता मनाई हुकूम घेतला होता.
------------------

न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
चौकशीअंती न्यायालयाने कॉलनी रोडवर बांधलेली भिंत काढून टाकण्यास नगरपालिकेला अधिकार असल्याचा निकाल दिल्याने नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे प्रमुख धनंजय अहिरे, अभियंता शालिमार कोर, रमेश धोंडगे यांच्या उपस्थितीत सदरची भिंत गुरुवारी (दि. २७ ) सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस नाईक जिभाऊ पवार, पोलीस नाईक नवनाथ पवार, अजय महाजन, भोईर यांच्या कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला.

Web Title: The controversial wall in Satana finally collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक