राफेल पुजनानंतरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत; कॅप्टन अजित ओढेकर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 07:28 PM2019-10-12T19:28:10+5:302019-10-12T19:30:52+5:30
नाशिक- फ्रान्समध्ये गेल्यानंतर राफेल लढावू विमान ताब्यात घेण्यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाचे केलेले पूजन आणि लिंबू नारळ ठेवल्याने त्यावरून वांदग सुरू झाला आहे. अनेकांनी त्याची निर्भत्सना करीत असून राजनाथसिंह हे अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अजित ओढेकर यांनी अशाप्रकारची टीका अनाठायी असल्याचे मत व्यक्त केले. सदरचा वाद अर्धवट ज्ञानावर आधारीत असल्याचे देखील ते म्हणाले.

प्रश्न: संरक्षण मंत्र्यांच्या राफेलच्या पुजन तसेच लिंबु नारळाचा त्यासाठी वापर करण्यामुळे वाद उदभवला आहे त्याविषयी काय सांगाल?
ओढेकर: राजनाथ सिंग यांनी राफेलय विमान शस्त्राचे पुजन करून शत्रूवर विजय मिळवण्याच्या कामात अदृष्य शक्तींना, देवतांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यातून चुकीचा अर्थ काढले जात आहेत. अशाप्रकारच्या पुजनातून सैनिकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न असतो. त्याला कोणतेही चुकीचे संदर्भ जोडता कामा नये. नविन विमानच नव्हे तर नविन रणगाडा किंवा अन्य काही साहित्य लष्करात दाखल होते तेव्हा देखील त्याचे पुजन होते.
प्रश्न: लष्करासारख्या विषयात जेथे थेट आमने सामने लढाई होते, तेथे अशाप्रकारचे विमान पुजनाचे कर्मकांड कितपत उपयुक्त?
ओढेकर: अनेकांना याबाबत मुळातच माहिती नाही. लष्कराच्या अनेक युनीटमध्ये ब्रिटीशकाळापासून अशाप्रकारच्या सर्वधर्मियांच्या श्रध्दा जोपासण्याचे आणि त्या माध्यमातून मनोबल वाढविण्याचे काम केले जाते. त्याविषयी गैर काहीच नाही. लष्कराच्या युनीटमध्ये दर रविवारी मंदिर परेड देखील असते. हे मंदिर म्हणजे सर्व धर्म स्थल असते. येथे देखील रामकृष्ण, तसेच ग्रंथसाहेब, ग्रंथसाहेब, कुराण, बायबल एकत्र असतात. त्यामुळे ते केवळ हिंदुंचेच असते असे नाही सर्व धर्मियांचे असते युनीटची कामगिरी चांगली व्हावी, फत्ते व्हावी यासाठी मंदिर परेड असते. त्यामुळे अशाप्रकारे लढावू विमानाची पुजा अर्चा करणे गैर काहीच नाही.
मुलाखत- संजय पाठक