पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांमध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:18 AM2018-11-16T00:18:05+5:302018-11-16T00:37:18+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकात गुरुवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात बसण्यावरून पासधारक प्रवाशांनी वाद घालून महिला प्रवाशाच्या पतीस धक्काबुक्की करून दमदाटी केली. काही पासधारकांच्या दादागिरीमुळे अन्य प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो.

Controversy among passengers in Panchavati Express | पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांमध्ये वादावादी

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांमध्ये वादावादी

googlenewsNext
ठळक मुद्देदमदाटी : पासधारकांकडून प्रवाशांना दादागिरी

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकात गुरुवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात बसण्यावरून पासधारक प्रवाशांनी वाद घालून महिला प्रवाशाच्या पतीस धक्काबुक्की करून दमदाटी केली. काही पासधारकांच्या दादागिरीमुळे अन्य प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो.
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मुंबई परिसरात दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी तीन बोगी आरक्षित आहेत. मात्र पासधारकांची संख्या जास्त असल्याने आरक्षित बोगी कमी पडतात. गुरुवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर कैलास राठी हे आपल्या पत्नीला मुंबईला सोडण्यासाठी प्लॅटफॉर्म तीनवर आले होते. सर्वसाधारणच्या ७ क्रमांकाच्या बोगीत कैलास यांनी पत्नीकरिता खिडकीजवळील जागा पकडली असता काही पासधारक तेथे येऊन ही पासधारकांची जागा आहे, असे म्हणून वाद घातला. राठी यांनी ही सर्वसाधारण बोगी आहे त्यामुळे ही जागा पत्नीसाठी पकडली आहे, असे सांगितल्यावर काही पासधारकांनी राठी यांच्याशी वादविवाद घालून धक्काबुक्की केली. वाद वाढल्यानंतर काही प्रवासी व पासधारकांनी मध्यस्ती करून वाद मिटविला. मात्र पंचवटी एक्स्प्रेसमध्ये काही पासधारक नेहमीच जागेवरून प्रवाशांशी वादविवाद घालून दादागिरी करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल याकडे काणाडोळा करत असल्याने प्रवाशांना चुपचाप सहन करावे लागते.

Web Title: Controversy among passengers in Panchavati Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.