सटाणा पाणीपुरवठा योजनेवरून वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:30+5:302021-07-04T04:10:30+5:30
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, रत्नाकर सोनवणे, नगरसेविका विद्या सोनवणे यांनी नुकतीच ...
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, रत्नाकर सोनवणे, नगरसेविका विद्या सोनवणे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शहरातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी, यासाठी थेट पूनद धरणातून सुमारे ४९.०६ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली. पालिकेने निविदा मागवल्यानंतर ९.९७ टक्के जादा दराने निविदा मंजूर केली. जादा दराने निविदा मंजूर करू नये याबाबत काही नगरसेवकांनी विरोध दर्शवूनही नगराध्यक्ष मोरे यांनी बहुमताच्या जोरावर निविदा मंजूर करून ५१ कोटी ३३ लाख ६४ हजार ४ ९ ८ रुपये एवढी योजनेची किंमत वाढवली. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही निदर्शनास आणून दिले. या योजनेच्या वाढीव कामांच्या नावाखाली पुन्हा शासनाच्या मुन्फ्रामार्फत सुमारे ८ कोटी १७ लाख ८० हजार ४०० रुपयांच्या कर्ज उभारणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या ठरावास राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ व इतर २७ नागरिकांनी हरकत घेतली असतानासुध्दा वाढीव खर्चाचा प्रस्ताव बेकायदा नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविण्यात आला असल्याचे नमूद केले आहे.
इन्फो
मुख्याधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा आरोप
तत्कालीन मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजुरी प्राप्त झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले असतानाही या योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार वाढीव कामाचा खर्च ८ कोटी १७ लाख रुपये हा १५व्या वित्त आयोगातून किंवा इतर शासकीय निधीतून मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना सादर केला आहे. पालिकेची आजची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मुन्फ्राकडून कर्ज काढून नगरपालिकेवर विनाकारण बोजा टाकू नये. त्यामुळे आगामी काळात विकासकामांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून प्रभारी मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी नगराध्यक्षांच्या दबावाला बळी पडून मुन्फ्रा या वित्तीय संस्थेकडे कर्ज उभारणीसाठी प्रस्ताव तयार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इन्फो
सखोल चौकशीची मागणी
शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करण्यात यावी, शासनाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून या योजनेची गुणवत्ता तपासण्यात यावी व वाढीव कामांची खरच गरज आहे का? यापूर्वीच त्या कामांचा समावेश अंदाजपत्रकांमध्ये का करण्यात आला नाही? वाढीव कामांसाठी १५वा वित्त आयोग किंवा शासनाकडून इतर शासकीय निधीतून निधीची मागणी का करण्यात आली नाही? त्यासाठी नगरपालिकेची आर्थिक स्थिती हालाखीची असताना मुन्फ्रा या वित्तीय संस्थेच्या माध्यमातूनच कर्जउभारणीचा अट्टहास का? याबाबत सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
फोटो- ०३ सटाणा वॉटर
सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देताना विजय वाघ, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, लालचंद सोनवणे, रत्नाकर सोनवणे, नगरसेविका विद्या सोनवणे आदी.
030721\03nsk_25_03072021_13.jpg
फोटो- ०३ सटाणा वॉटर सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देताना विजय वाघ ,माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे , लालचंद सोनवणे, रत्नाकर सोनवणे, नगरसेविका विद्या सोनवणे आदी.