जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष आत्महत्येच्या चर्चेचे वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:01 AM2019-01-11T02:01:02+5:302019-01-11T02:01:17+5:30

एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्धी बाटली प्या, मी पण अर्धी पितो’, असा सल्ला शेतकºयाला दिल्यामुळे काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला; परंतु उपस्थित अधिकारी व अन्य शेतकºयांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकण्यात आला.

The controversy over the suicide of the District Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष आत्महत्येच्या चर्चेचे वादंग

जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष आत्महत्येच्या चर्चेचे वादंग

Next
ठळक मुद्देवसाका उसाचे पेमेंट : शेतकरी-आमदारामध्ये जुंपली

नाशिक : एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्धी बाटली प्या, मी पण अर्धी पितो’, असा सल्ला शेतकºयाला दिल्यामुळे काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला; परंतु उपस्थित अधिकारी व अन्य शेतकºयांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकण्यात आला.
विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी शेतकºयांना २३०० रुपये भाव देण्याचे कारखान्याने जाहीर केले होते. त्यानुसार ऊस उत्पादकांना प्रारंभी पाचशे रुपयांचा हप्ता दिला व शेतकºयांनी ऊस तोडून नेला. शेतकºयांना उसाचे पैसे देण्यासाठी ठरवून दिलेला कालावधी उलटून गेल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे पाहून शेतकºयांनी तगादा लावताच, काही शेतकºयांना नऊशे रुपये अदा करण्यात आले. त्यानंतर मात्र शेतकºयांना उर्वरित पैशांसाठी तारीख पे तारीख देण्यात आली. शेकडो ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपये कारखान्याकडे घेणे असताना सदरचा कारखाना प्रशासकीय मंडळाने खासगी व्यक्तीला चालविण्यासाठी दिला. (पान ५ वर)

असे करताना ऊस उत्पादक शेतकºयांचे चुकारे पूर्ण करण्यात आल्याचे खोटे दाखवून सहकार आयुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्रही मिळविण्यात आले. आता कारखाना खासगी व्यक्तीच्या ताब्यात असून, ऊस उत्पादक शेतकºयांची थकीत रक्कम देण्यास तत्कालीन संचालक मंडळ तसेच सध्याच्या ठेकेदारानेदेखील हात वर केले आहेत. अशा परिस्थितीत थकीत पैसे मिळावे यासाठी शेतकरी आंदोलन करीत असताना बाळासाहेब डेर्ले या शेतकºयाने काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या बॉयलरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला पैसे देण्याचे आश्वासन देऊन समजाविण्यात आल्यावर या संदर्भात गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांच्याकडे ऊस उत्पादक शेतकरी, आमदार राहुल आहेर व वसाका कारखान्याच्या ठेकेदार यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत बाळासाहेब डेर्ले यांनी पैसे मिळत नसतील तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा उल्लेख करताच, आमदार आहेर यांनी त्यांना किती कर्ज आहे, अशी विचारणा केली त्यावर डेर्ले यांनी तीन लाख रुपये असे सांगितले. त्यावर आहेर यांनी माझ्यावर सात कोटी रुपयांचे कर्ज असून, ‘तुम्ही पण अर्धी बाटली प्या व मी पण अर्धी पितो’ असा सल्ला दिला.

दोघांमध्ये सुरू असलेल्या संभाषणामुळे वातावरण गंभीर वळणावर येऊन पोहोचताच, उपस्थित शेतकºयांनी तसेच अधिकाºयांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत केले. यावेळी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे आपली बाजू मांडली. तर आमदार आहेर यांनी यासंदर्भात लवकरच शेतकरी व कारखाना चालविणाºया ठेकेदाराची संयुक्त बैठक घेण्याचे मान्य केले.
चौकट=====

Web Title: The controversy over the suicide of the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.