मतभेद हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण :देगलूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:50 AM2019-01-11T00:50:16+5:302019-01-11T00:51:14+5:30
वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
नाशिक : वेगवेगळ्या घटकांमध्ये, व्यक्तींमध्ये मतभेद असणे हे समाजाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा विचार करीत असला तरी त्यांच्या विचारातील एक समानतेचा धागा विषमतेत समता दर्शविणारा असतो. त्याचमुळे संतांनी ‘वैविध्यतेत एकता, विषमतेत समता शोधण्याचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा निरूपणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
बस्तीरामजी सारडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे परशुराम साइखेडक र नाट्यगृहात बस्तीराम सारडा यांच्या ५५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ‘संतांना अपेक्षित सामाजिक समता समाज का स्वीकारत नाही?’ विषयायावर तीनदिवसीय व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफतांना ते गुरुवारी (दि.१०) बोलत होते. व्याख्यानमालेत मंगळवारी (दि.८) पहिले पुष्प गुुंफतांना त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीच संतांचे अवतरण झाले व त्यांना वाङ्मय निर्मिती करावी लागली. त्यातून त्यांनी मानवी कल्याणाचाच मार्ग प्रशस्त केल्याचे सांगितले, तर बुधवारी (दि.९) तृतीय व अंतिम पुष्प गुंफताना संत समजून घ्यायचे असतील तर सर्वप्रथम त्यांच्या वैचारिकतेला, उद्गाराला, उपदेशाला असलेला सामाजिक अधिष्ठानाचा आवाका समजून घेण्याचे आवाहन केले.
व्याख्यानमालेचा समारोप कराताना देगलूरकर महाराज म्हणाले, विश्वातील विविधता व विषमता कधीच संपू शकत नाही. तसे संतांनाही अपेक्षित नाही. त्यामुळेच संतांनी वेगवेगळ्या घटकांची समानतेचा धागा पकडून समाजाला समानतेचा संदेश दिला, जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवताना त्याचा आत्मा हा समानतेचा केंद्र मानले.