नायगाव खोऱ्यात पशु-पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:58 PM2019-05-21T18:58:03+5:302019-05-21T18:58:40+5:30
नायगाव : ‘एक घास चिऊचा एक घास काऊचा’ म्हणत अनेकांनी त्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था केली. मानवाने दाखवलेल्या भूतदयेला पक्षीही प्रतिसाद देत असल्याचे पाहुन अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कधी नाही एवढया मोठ्या प्रमाणात नायगाव खोºयात यंदा पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जेथे माणसाला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते तेथे मुक्या प्राण्यांची अवस्था काय असणार आहेत, या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी पक्षाच्या चारा-पाण्यासाठी आपल्या घरात, अंगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी आप-आपल्या पध्दतीने व्यवस्था केली. अनेक सामाजिक संस्था, विविध शाळा व गु्रप अशा सर्वांनी भूतदया दाखवत दाणा-पाण्याची व्यवस्था केली. मनुष्याची तृष्णा भागविण्यासाठी ज्या प्रमाणे पाणपोईची व्यवस्था ठिकठिकाणी केली जाते त्याच प्रमाणे नायगाव खो-यातही मोठया प्रमाणावर नागरिकांनी पक्षी व प्राण्यांसाठी सुख सुविधा करण्यासाठी मेहनत घेतल्याचे सुखद चित्र बघावयास मिळत आहे. मानवाने दाखवलेल्या भुतदयेला पक्षांनीही चांगलाच प्रतिसाद देत आपल्यासाठी ठेवलेल्या दाणा पाण्याचा लाभ घेत मानवाच्या कष्टाला साद घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलके चित्र परिसरातील अंगणामध्ये दृष्टीस पडत आहे.