लासलगाव येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 01:06 IST2020-10-13T23:41:34+5:302020-10-14T01:06:14+5:30
लासलगाव : येथे भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखा लासलगाव शहर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तभूमी येथे केलेल्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

लासलगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनप्रसंगी मनेहर अहिरे, जालिंदर बगाडे, रामभाऊ शेजवळ,प्रकाश संसारे, सोनु शेजवळ, सागर आहिरे, डॉ अमोल शेजवळ आदी.
लासलगाव : येथे भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखा लासलगाव शहर शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तभूमी येथे केलेल्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मनोहर आहिरे व प्राध्यापक जालिंदर बगाडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. मनोहर आहिरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्त भूमी या ठिकाणी केलेल्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिना निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी कवी गायक निवृत्ती संसारे यांनी भीम गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी नारायण साळवे शिवनाथ चव्हाण रामदास वाघ अजय गांगुर्डे जयभिम सोनवणे यश शेजवळ करण वीसते सचिन यलिंजे शामराव साळवे भास्कर शेजवळ रोहन शेजवळ आदी उपस्थित होते.