बँक्वेट हॉलचे मिनी रुग्णालयात रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:17+5:302021-04-26T04:13:17+5:30

वडाळागाव, अशोकामार्ग, पखालरोड, काजीनगर, विधातेनगर, हॅप्पी होम कॉलनी या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील रुग्णांना आता ...

Conversion of Banquet Hall to Mini Hospital | बँक्वेट हॉलचे मिनी रुग्णालयात रूपांतर

बँक्वेट हॉलचे मिनी रुग्णालयात रूपांतर

Next

वडाळागाव, अशोकामार्ग, पखालरोड, काजीनगर, विधातेनगर, हॅप्पी होम कॉलनी या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील रुग्णांना आता डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय असो किंवा नाशिकरोडचे बिटको रुग्णालय असो, कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने हेळसांड सहन करावी लागत होती. रुग्णालयांमधील जागा हाऊसफुल्ल झाल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर सामाजिक भावनेतून फाउंडेशनचे संस्थापक हाजी मुजाहिद शेख व संचालक इस्माईल शेख यांनी त्यांच्या स्व मालकीच्या बँक्वेट हॉलचे रूपांतर मिनी रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला. या बँक्वेट हॉलमध्ये वीस खाटांसह आवश्यक ते सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच रुग्णांना लागणारी गोळ्या-औषधे, सलाईन, इंजेक्शनचाही पुरवठा करण्यात येत असल्याचे इस्माईल यांनी सांगितले.

--इन्फो--

कोरोनाबाधितांवरही औषधोपचार

या मिनी रुग्णालयात केवळ साधा थंडी, ताप, अंगदुखीच्या तक्रारी असणाऱ्या रुग्णांवरच नाही, तर कोरोना नमुना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवरदेखील वैद्यकीय उपचार केले जात आहे. येथील सर्वच खाटा भरल्या आहेत. ज्या रुग्णांना ॲडमिट करून घ्यावयाची गरज नाही, त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविले जाते. येथे छातीरोग तज्ज्ञ डॉ. दिनेश वाघ, डॉ. समीर शेख, डॉ. तोहीद अहेमद, डॉ. शब्बीर अहेमद, डॉ. रईस सिद्दीकी, डॉ. ओवेस शेख हे रुग्णांवर उपचार करत आहेत. या युसुफिया हेल्थ केअर सेंटरचा बहुतांश रुग्णांना लाभ होत आहे.

--कोट--

युसुफिया हेल्थ केअर सेंटर हे पूर्णपणे सर्व गरजुंसाठी खुले असून येथून औषधोपचार व वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत पुरविली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरही याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. लवकरच खाटांची संख्या व ऑक्सिजन सिलिंडरची संख्या वाढविली जाणार आहे.

-इस्माईल शेख, संचालक

---

फोटो आर वर २५युसुफिया नावाने सेव्ह आहे.

Web Title: Conversion of Banquet Hall to Mini Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.