जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:45 AM2018-04-07T00:45:51+5:302018-04-07T00:45:51+5:30
चांदवड : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा (दगडी शाळा) माजी विद्यार्थी फोरम, शिक्षणप्रेमी व नागरिक यांच्या सहभागातून कायापालट करण्यता आला.
चांदवड : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा (दगडी शाळा) माजी विद्यार्थी फोरम, शिक्षणप्रेमी व नागरिक यांच्या सहभागातून कायापालट करण्यता आला. डिजिटल वर्गाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी व विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, रत्नाकर अहिरे (मुंबई), प्राचार्य यू. बी. कुलकर्णी, प्राचार्य वाय. एन. देवरे, प्राचार्य दत्तात्रय बारगळ, राजेंद्र डुंगरवाल, बाळासाहेब वाघ, नगरसेवक अशपाक खान, अल्ताफ तांबोळी, रेखा गवळी, जयश्री हांडगे, लीलाबाई कोतवाल, जमीर शेख, विस्तार अधिकारी आर. एन. निकम, कें द्रप्रमुख डी. के. शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीलेश माळी, कांतिलाल बाफना, शिक्षक समितीचे काळू बोरसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्याध्यापक अशोक वाघ व संदीप महाले यांनी स्वागत केले. शांताराम हांडगे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक खंडू सोनवणे, माजी विद्यार्थी व शिक्षक संदीप महाले यांनी परिश्रम घेतल्याने ही शाळा उभी राहू शकली, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. माजी विद्यार्थी संजय जाधव यांनी खेळणी मोफत देण्याचे आश्वासन दिले, तर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न केले. मुंबई येथील रत्नाकर अहिरे यांनीए जगावे कसे व शिक्षक कसा असावा या विषयावर मार्गदर्शन केले. खंडू सोनवणे यांनी आभार मानले.