गर्दीच्या ठिकाणी दागिने चोरणाºया महिलेकडून ११ तोळे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:32 PM2017-11-24T23:32:26+5:302017-11-25T00:31:17+5:30
बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व दागिने चोरणाºया महिलेस गुन्हे शाखेच्या युनिट एकने पोलिसांनी पकडले असून, तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे़ धनश्री प्रकाश विसपुते (२५ रा.म्हाडा कॉलनी, सामनगावरोड) या संशयित महिलेचे नाव असून, विशेष म्हणजे तिने काही दागिन्यांची विक्री, तर काही तारण ठेवल्याचे समोर आले असून, यातील बहुतांशी चोºया या भद्रकाली, पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत केल्याचे तपासात समोर आले आहे़
नाशिक : बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व दागिने चोरणाºया महिलेस गुन्हे शाखेच्या युनिट एकने पोलिसांनी पकडले असून, तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे़ धनश्री प्रकाश विसपुते (२५ रा.म्हाडा कॉलनी, सामनगावरोड) या संशयित महिलेचे नाव असून, विशेष म्हणजे तिने काही दागिन्यांची विक्री, तर काही तारण ठेवल्याचे समोर आले असून, यातील बहुतांशी चोºया या भद्रकाली, पंचवटी व मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत केल्याचे तपासात समोर आले आहे़ सोन्याचे दागिने चोरी जाण्याच्या घटनांमध्ये गत काही महिन्यांपासून चांगलीच वाढ झाली होती़ त्यामुळे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेस गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते़ गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी पोलीस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांच्या यादीवरील संशयित धनश्री विसपुते हीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने भद्रकाली, पंचवटी आणि मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. संशयित विसपुते हिने चोरलेल्यांपैकी काही दागिने सराफाकडे गहाण ठेवल्याचे तर काहींची विक्री केल्याची माहिती दिली़ त्यानुसार अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये दोन सोन्याचा बांगड्या व ३५ ग्रॅम लगडचा समावेश आहे़ गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र मोहिते, सचिन खैरनार, दीपक गिरमे, पोपट कारवाळ, जाकिर शेख, रवींद्र बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली़