पाटणे सोसायटीच्या मागण्यांचे जिल्हा बँकेला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:33+5:302021-06-09T04:16:33+5:30
पाटणे सोसायटीच्या मालकीच्या इमारतीत सुरू असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेचा जुना १५ वर्षांचा भाडेपट्टा करार रद्द करून ५ वर्षांचा ...
पाटणे सोसायटीच्या मालकीच्या इमारतीत सुरू असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेचा जुना १५ वर्षांचा भाडेपट्टा करार रद्द करून ५ वर्षांचा नवीन करारद्वारे सुधारित दराने मागील तीन वर्षांपासून थकीत भाडे रक्कम त्वरित मिळावी, पीक कर्जापासून वंचित शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून ‘खास बाब’ म्हणून पाटणे सोसायटीला जादा वाढीव निधी मिळावा या दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी अधिकारी पिंगळे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात पाटणे सोसायटीचे चेअरमन जीवन आहिरे, ज्येष्ठ संचालक वसंतराव अहिरे, रत्नकांत निकम, बाळासाहेब पगार, विलास खैरनार, प्रदीप शेवाळे यांचा समावेश होता.
इन्फो
मागण्या केल्या मान्य
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी मागील १५ वर्षांचा भाडेपट्टा करार रद्द करण्याची मागणी मंजूर करून बँकचे मासिक भाडेपट्ट्यात ५०० रुपयांनी भाडेवाढ करण्याचे मान्य केले तसेच नवीन सुधारित ५ वर्षांचा करार करून मागील ३ वर्षांपूर्वीपासूनची एकूण थकबाकीची रक्कम सोसायटी खाती त्वरित जमा करण्याचे मान्य केले. पाटणे सोसायटीला खास ‘विशेष बाब’ म्हणून १५ लाख रुपये कर्ज वाटपासाठी वाढवून देण्यासही मान्यता देण्यात आली.