चांदवड येथील विवाहितेचा छळ
By admin | Published: November 6, 2015 10:12 PM2015-11-06T22:12:12+5:302015-11-06T22:12:54+5:30
चांदवड येथील विवाहितेचा छळ
चांदवड : माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक, मानसिक छळ करून उपाशीपोटी ठेवल्याची फिर्याद डावखरनगर येथील माहेर असलेल्या अर्चना अंकुश शिंदे (२६) व तिचे वडील शांताराम धोंडू पवार यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अर्चना शिंदे हिचे सटाणा येथे सासर असून, पती अंकुश दादाजी शिंदे, सासरे दादाजी रामभाऊ शिंदे, सासू सुनीता शिंदे, नणंद चारू प्रशांत महाजन, रा. शहापूर यांनी अर्चना हीस माहेरून नवीन प्लॉट खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला. तिला उपाशीपोटी ठेवले. अर्चनाचा विवाह दि. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी चांदवड येथे थाटात लावून दिला होता. त्यावेळीही बरीच रक्कम, दागिने, चीज वस्तू सासरच्यांना दिले होते. अर्चना हीस एक वर्षाचा श्लोक नावाचा मुलगा असून, पती अंकुश शिंदे हे धुळे येथे एरिकेशन खात्यात क्लर्क आहेत.
चांदवड पोलिसांनी हुंड्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सुभाष जाधव, एच. बी. कदम करीत आहेत. (वार्ताहर)