आज थंडावणार प्रचाराच्या तोफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:13 AM2019-10-19T00:13:17+5:302019-10-19T00:15:37+5:30
सिन्नर/मालेगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज खाली बसणार आहे. सर्वच उमेदवारांकडून शेवटच्या दिवशी शहरी भागात प्रचारफेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन करण्यावर भर असल्याचे दिसून येते. प्रचाराची सांगता दणक्यात करण्यासाठी सर्वांनीच नियोजन केले आहे.
सिन्नर/मालेगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आज खाली बसणार आहे. सर्वच उमेदवारांकडून शेवटच्या दिवशी शहरी भागात प्रचारफेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन करण्यावर भर असल्याचे दिसून येते. प्रचाराची सांगता दणक्यात करण्यासाठी सर्वांनीच नियोजन केले आहे.
विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून, उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. १९ आॅक्टोबर रोजी प्रचारतोफा थंडावणार असल्याने गावोन्गाव पिंजून काढण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे समर्थक करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाल्याचे दिसते. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी निर्माण झाली असून, कोण विजयी होणार याचीच सर्वांना उत्सुकता आणि चर्चा रंगू लागली आहे.
नाशिक जिल्ह्यात पंधरा विधानसभा मतदारसंघात
निवडणूक होत आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी आणि तिरंगी लढती होत आहेत. सेना-भाजप - रिपाइं (आठवले) -रासप, शिवसंग्राम यांची महायुती असून, कॉँग्रेस-राष्टÑवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (कवाडे) आदींची महाआघाडी आहे. त्यामुळे या प्रमुख पक्षांत खरी लढत होत आहे. शहरी भागात काही ठिकाणी मनसेने व वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पक्षाचे झेंडे, लोकगीते यांनी वातावरण निवडणूकमय झाले आहे. ग्रामीण भागात उमेदवारांनी आठ - दहा दिवस गट-गणनिहाय प्रचाराचे दौरे केले. आता शेवटच्या दिवशी शहरी भागात लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या उमेदवाराची प्रचार रॅली काढली जाते. उमेदवार मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. उमेदवार शेवटच्या दिवशी शहरात शक्तिप्रदर्शन करणार आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सर्वच उमेदवार आज मोटारसायकल रॅली, प्रचारफेरी काढून वातावरण ढवळून काढणार आहेत. प्रचाराची लगीनघाई, गल्लोगल्ली पदयात्रासोमवारी होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (दि. १९) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराची सायंकाळी ५ वाजता सांगता होणार आहे. अवघा एकच दिवस हातात उरल्याने प्रचारचा धुरळा उडाला असून, गावोगावी, गल्लोगल्लीत लगीनघाईचा माहोल आहे. पदयात्रा, रॅली, कोपरासभांच्या माध्यमांतून उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निकराचा प्रयत्न करीत आहेत. गटांच्या फोडाफोडींसह एकगठ्ठा मतदानासाठी रसद पोहोचविणारी छुपी यंत्रणा सक्रिय झाली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर सभेपेक्षा वैयक्तिक गाठीभेटीवरच भर देण्याचे उमेदवारांचे नियोजन
दिसते. सभेत यंत्रणा गुंतविण्याऐवजी गावागावांत, गल्लोगल्ली पदयात्रांवरच
भर आहे. शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला जात आहे.छुप्या प्रचाराला येणार वेगमतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मतदानाच्या वेळेपासून ४८ तासांपूर्वीच प्रचार बंद करावा लागतो. सोमवारी मतदान होणार असल्याने शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे. बॅनर, झेंडे उतरवून ठेवण्यासह गाड्यांचे भोंगे बंद होणार आहेत. असे असले तरी छुप्या प्रचाराला शनिवारी सायंकाळपासून वेग येणार आहे. उर्वरित दोन दिवस निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. याच कालावधीत मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विविध प्रलोभने दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. जाहीर प्रचार संपल्यानंतर छुप्या प्रचाराला वेग येणार असला तरी त्यावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहाणार आहे.