कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य तपासणीस सहकार्य करा - दत्तात्रय गोसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:57 PM2020-09-18T16:57:40+5:302020-09-18T17:00:49+5:30
सिन्नर: दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून यापुढे अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तर नक्कीच आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो त्यासाठी आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होवून आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून सहकार्य करा असे आवाहन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी केले आहे.

नायगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घिगे, प्रशासक सदगीर, सरपंच नीलेश कातकाडे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र सातपुते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र गिलबीले, आरोग्य सहाय्यक अभिजित देशमुख, विठ्ठल राठोड, सचिन अत्रे, आरोग्य सेविका संगिता केदारे, परिचारिका करुणा जाधव, सुशिला जाधव, मेघा भोसले,आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी ह्णमाझे कुटुंब, माझी जबाबदारीह्ण या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी आरोग्य केंद्राच्यावतीने 21 पथकांची नेमणुक केली असून 63 कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील. तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सहकार्य करून सर्वांनी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. या तपासणीच्या माध्यमातून कोरोनाचे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहिल. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेय गोसावी यांनी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचा सन्मान करुन त्यांना मास्क, बिस्कीट, पेन व कोवीड योध्दा सन्मानपत्र देण्यात आले.