सहकाराचे ग्रामीण विकासात योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:59 PM2019-01-30T23:59:32+5:302019-01-31T00:02:30+5:30
निफाड : सहकाराशिवाय राज्याच्या प्रगतीचा विकास होऊ शकत नाही. सहकार क्षेत्राचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.
निफाड : सहकाराशिवाय राज्याच्या प्रगतीचा विकास होऊ शकत नाही. सहकार क्षेत्राचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.
स्वर्गीय शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण, स्वर्गीय शांतीलालजी सोनी यांच्या पुतळ्याचे अनावरण, स्वर्गीय बाळासाहेब सोनवणे व स्वर्गीय खंडूशेठ आहेरराव सभागृहाच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रंबकराव गुंजाळ होते. व्यासपीठावर मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, शांताराम बनकर, सुरेश डावरे, जि. प. सदस्य यतिन कदम, अमृता पवार, राजाभाऊ शेलार, राजेंद्र मोगल, राजेंद्र राठी, नंदलाल चोरडिया, शिवाजी ढेपले, वि. दा. व्यवहारे, नगरसेवक अनिल कुंदे, मनोहर त्रिभुवन, सरोज पाटील, आबासाहेब कोठावदे, पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी, उपाध्यक्ष अंबादास गोळे उपस्थित होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी यांनी प्रास्ताविक केले. आधुनिक तंत्रज्ञानाने सुलभ सेवा देऊ व ठेवीदारांसाठी सभासदत्व खुले करू तसेच संस्थेला दिलेल्या नावाबद्दल सभासदांचे आभार मानून १२३ कोटींच्या वर ठेवी म्हणजे संस्थेवरील विश्वास असून, संस्था अत्यंत सक्षम रीतीने वाटचाल करीत आहे, असे सोनी त्यांनी सांगितले.
याप्रसंगी किरण कापसे, अनिल बिवालकर, जावेद शेख, दिलीप कापसे, विक्रम रंधवे, मधुकर शेलार, संजय कुंदे, नितीन कापसे, राजेंद्र बोरगुडे, संजय गाजरे, दत्ता उगावकर, इरफान सैयद, आदींसह संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास गोळे, संचालक कांतीलाल कायस्थ, प्रकाश सुराणा, भास्कर ढेपले, गणपत व्यवहारे, संपत कराड, मधुकर राऊत, अशपाक पठाण, संतोष आहेरराव, हेमंत खडताळे, मीना कुंदे, प्रीती गिडिया, अशोक चोरडिया, प्रमोद जडे, रामनाथ सानप आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. (वा.प्र)निफाड तालुक्यात गरज तिथे अभ्यासिका उभारण्यास प्रारंभ होणार असून, या उपक्र माची सुरु वात झाली आहे. कोठुरे, नादुर्डी येथेही अभ्यासिका सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- विनायक पाटील, माजी मंत्री