प्रशासन-लोक प्रतिनिधींच्या समन्वयामुळे टळला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:50+5:302021-09-17T04:19:50+5:30

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे चांदोरीसह सायखेडा करंजगाव, शिंगवे यासह गोदाकाठ परिसर नेहमी पुराच्या ...

Coordination of administration-people's representatives averted the threat of floods | प्रशासन-लोक प्रतिनिधींच्या समन्वयामुळे टळला पुराचा धोका

प्रशासन-लोक प्रतिनिधींच्या समन्वयामुळे टळला पुराचा धोका

Next

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे चांदोरीसह सायखेडा करंजगाव, शिंगवे यासह गोदाकाठ परिसर नेहमी पुराच्या संकटाचा सामना करत आहे. नेहमीच येतो पावसाळा यानुसार पावसाळा व महापूर हे नेहमीचं समीकरण. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची धावपळ नेहमीची. गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड वित्तहानी होऊन शेतीचेही नुकसान झाले. त्याचे शासकीय सोपस्कार पार पाडत पंचनामे केले गेले, परंतु अजून ही त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यातच दारणासह इतर छोट्या धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांची चिंता निर्माण झाली होती.

आमदार दिलीप बनकर यांनी जलसंपदाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यासमवेत समन्वय साधून धरणांतील होणाऱ्या विसर्गापेक्षा जास्त विसर्ग नांदूर मध्यमेश्वर धरणातून केला गेला. नांदूर मध्यमेश्वर धरणातून १६ सप्टेंबरपर्यंत १५१७८६ क्युसेक विसर्ग झाला आहे.

१३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे रवाना झाले. त्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भागात नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे थोड्याशा चुकीमुळे निर्माण होणारा महापूर लोकप्रतिनिधी व जलसंपदाचे अधिकारी यांच्या समन्वयातून टळला गेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चौकट...

मागील वर्षीदेखील असेच नियोजन

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला सर्व धरणे भरलेली असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला होता तेव्हादेखील जलसंपदा विभागाच्या योग्य नियोजनामुळे पूरपरिस्थिती टळली होती.

कोट...

जलसंपदाचे अधिकारी यांच्या सोबत समन्वय ठेऊन पूरनियंत्रणाचा प्रयत्न केला. नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पात येणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त विसर्ग वाढवला. प्रसंगी मध्यरात्री धरणाचे गेट उघडण्याच्या सूचना दिल्याने गोदाकाठ भागाला बॅकवॉटरचा फटका बसला नाही.

-दिलीप बनकर, आमदार, निफाड.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागातील धरणांत होणाऱ्या पाण्याचा विसर्ग व नांदूर मध्यमेश्वर धरणातील पाणीसाठा यात योग्य समन्वय राखल्याने गोदाकाठ भागात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. यामुळे आमदार दिलीप बनकर व जलसंपदाचे अधिकारी यांचे कौतुक करावे लागेल.

- सिद्धार्थ वनारसे, सदस्य जि.प. नाशिक.

दारणा व गंगापूर धरणातून पाण्यातून विसर्ग केल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहोचण्यास साधारणतः ८ ते १० तास लागतात. पाणी पोहोचण्याचे अंदाज करून विसर्ग केला जात असल्याने पाण्याचा फुगवटा यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती टाळता आली.

- शरद नागरे, शाखा अभियंता, नांदूरमध्येश्वर धरण.

पूरपरिस्थिती सांभाळताना लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योग्य नियोजनामुळे शेतकरीबांधवांचे पूरपाण्यामुळे होणारे नुकसान टळले आहे.

- सूरज राजोळे, शेतकरी, चांदोरी.

(१६ चांदोरी १) नांदूर मध्यमेश्वरमधून होणारा विसर्ग.

Web Title: Coordination of administration-people's representatives averted the threat of floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.