विद्रोही साहित्य संमेलनात संविधान प्रत वाटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:57+5:302021-03-04T04:25:57+5:30

संमेलनाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीचे प्रास्ताविक संयोजक राजू देसले यांनी केले. बैठकीत उपस्थित संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी, तसेच भारतीय संविधानाच्या विविध ...

A copy of the constitution will be distributed at the Vidrohi Sahitya Sammelan | विद्रोही साहित्य संमेलनात संविधान प्रत वाटणार

विद्रोही साहित्य संमेलनात संविधान प्रत वाटणार

Next

संमेलनाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीचे प्रास्ताविक संयोजक राजू देसले यांनी केले. बैठकीत उपस्थित संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी, तसेच भारतीय संविधानाच्या विविध घटकांचे प्रतिनिधित्व व अविष्कार संमेलनात असावेत, या संदर्भात सूचना केल्या. संमेलनाची मूठभर धान्य व एक रुपया मोहीम नाशिक शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी राबविण्याची जबाबदारी व भारतीय संविधान प्रबोधन कार्यक्रम निश्चित करण्यात आले, तसेच भारतीय संविधानाच्या विषयावर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रप्रदर्शन करण्याचा निर्णय झाला, तसेच आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय संविधानाच्या विषयी परिसंवाद, गटचर्चा आयोजित करण्यात येणार आहे. संमेलनात विविध ठरावाविषयी चर्चा झाली, तसेच संमेलनाच्या प्रसार, प्रचाराच्या निमित्ताने महिला ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन करण्यात येणार आहे. या समितीत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून, तुळशीराम जाधव यांनी लिहिलेल्या हस्तलिखित राज्यघटना व दृष्टिक्षेपात भारताचे संविधान या पुस्तिकेचे प्रकाशन संमेलनात करण्यात येणार आहे. बैठकीस संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, प्रभाकर धात्रक, किशोर ढमाले आदींनी मार्गदर्शन केले. दिल्ली आंदोलनात शहीद शेतकऱ्यांना, तसेच नंदुरबार येथील दिल्ली आंदोलनात शहीद झालेल्या सीताबाई तडवी यांना श्रद्धांजली देऊन बैठकीचा समारोप करण्यात आला.

यावेळी संविधान प्रबोधन समितीचे समन्वयकपदी शिवदास म्हसदे, प्रा.नारायण पाटील, अजमल खान, विजय जगताप, प्रल्हाद मिस्त्री यांची निवड करण्यात आली. समितीत ॲड.नाजिम काजी, नितीन मते, तुळशीराम जाधव, आर.आर. जगताप, प्रा.नारायण पाटील, अजमल खान, महेंद्र गायकवाड, नवनाथ आढाव, विजय जगताप, प्रल्हाद मिस्त्री, निखिल भुजबळ, ॲड.केशव खैरे, राज निकाळे, यशवंत बागुल आदींचा समावेश करण्यात आला.

Web Title: A copy of the constitution will be distributed at the Vidrohi Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.