मक्याचा चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:12 IST2020-02-25T22:58:42+5:302020-02-26T00:12:44+5:30
देवळा तालुक्यातील खालप येथे मंगळवारी दुपारी मीनाक्षी केशवराव सूर्यवंशी यांच्या शेतातील गावाशेजारी लगत असलेल्या गट नंबर १३३ मधील पंचवीस ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक झाला असून, लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मक्याचा चारा खाक
लोहोणेर : देवळा तालुक्यातील खालप येथे मंगळवारी दुपारी मीनाक्षी केशवराव सूर्यवंशी यांच्या शेतातील गावाशेजारी लगत असलेल्या गट नंबर १३३ मधील पंचवीस ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक झाला असून, लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शेतालगतच खालप येथील आदिवासी वस्ती आहे, मात्र सटाणा येथील अग्निशमन दलाचा बंब वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. सूर्यवंशी यांनी आपल्या शेतात सुमारे पंचवीस ते तीस ट्रॉली मका चारा रचून ठेवला होता. अचानक दुपारी आग लागल्याने त्यांचा मका चारा, मका भुसा, बांबूकाठी, ठिबक सिंचन संच असे सुमारे दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, तलाठी दिलीप कदम यांनी पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.