कोरोनाबाधित ४,६१९; बळी २५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:29+5:302021-04-06T04:14:29+5:30

नाशिक : अवघ्या दहा दिवसांत बळींच्या संख्येने कोरोना बळींनी चौथ्यांदा पंचवीसचा आकडा गाठला असून, बळींमधील ही वाढ प्रशासनाच्या चिंतेचे ...

Corona-affected 4,619; Victim 25 | कोरोनाबाधित ४,६१९; बळी २५

कोरोनाबाधित ४,६१९; बळी २५

Next

नाशिक : अवघ्या दहा दिवसांत बळींच्या संख्येने कोरोना बळींनी चौथ्यांदा पंचवीसचा आकडा गाठला असून, बळींमधील ही वाढ प्रशासनाच्या चिंतेचे कारण ठरली असून, आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,४९७ वर पोहोचली आहे, तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा साडेचार हजारांचा आकडा ओलांडून सोमवारी (दि.५) एकूण ४,६१९ पर्यंत मजल मारली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी रोखणे हेच प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,५७२, तर नाशिक ग्रामीणला १,८५४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १२३ व जिल्हाबाह्य ७० रुग्णबाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, ग्रामीणला ८, तर जिल्हाबाह्य २, असा एकूण २५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल साडेचार हजारांवर आणि पाच हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असाच सूर व्यक्त होऊ लागला आहे.

इन्फो

उपचारार्थी रुग्णसंख्या ३० हजारांवर

जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३० हजार ७५३ वर पोहोचली आहे. त्यात १८ हजार ५४६ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ९ हजार ८७२ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, २ हजार ९६ मालेगाव मनपा क्षेत्रातील तर जिल्हाबाह्य २३९ रुग्णांचा त्यात समावेश आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल पाच हजारांवर

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या ५ ते ६ हजारांवर रहात आहेत. सोमवारीही प्रलंबित अहवालांची संख्या ५,१६५ असून, त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक मनपा क्षेत्रातील ३,०५३ आहेत. नाशिक ग्रामीणचे १,७७७ तर, मालेगाव मनपाचे ३३५ अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: Corona-affected 4,619; Victim 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.