जिल्ह्यातील कोरोनाबाधित आठ हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 01:28 AM2020-07-17T01:28:10+5:302020-07-17T01:28:25+5:30
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६) दिवसभरात ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या ३६५वर पोहोचली आहे, तर तब्बल ३३१ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांचा आकडा आठ हजार पार जाऊन ८१६५वर पोहोचला आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी प्रचंड मोठ्या संख्येने वाढ झाली. त्यात नाशिक ग्रामीण ९९ नाशिक शहर २३२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये नाशिक शहर ५ आणि नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
पाच दिवसात हजारावर बाधित
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. विशेष म्हणजे गत ५ दिवसांत एक हजारावर नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
१२ जुलैच्या रविवारी जिल्ह्यात ७ हजार झालेली रु ग्णसंख्या गुरु वारअखेर आठ हजारपार पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
सिन्नर तालुक्यात बाधितांचे त्रिशतक
सिन्नर शहरासह तालुक्यात दिवसागणिक कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी (दि. १६) ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व कोवीड केअर सेंटरमधील रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. ३१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३०२ वर पोहोचली आहे.