आदिवासी अतिदुर्गम भागातही कोरोनाचा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:39 PM2020-07-18T20:39:26+5:302020-07-19T00:59:03+5:30
अलंगुण : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील सुरगाणा व बोरगाव येथे बाधित रुग्ण असल्याचे समोर आले असताना आदिवासी दुर्गम भागातील हडकाईचोंड येथील संशयित रु ग्णास क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.

संशयितास १७ जुलै रोजी घशात होणाऱ्या त्रासाची तक्र ार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र पांगारणे येथे स्वत: दाखल झाला होता. आरोग्य अधिकारी डॉ. जयेंद्र थविल यांनी तपासून उपचार केले. यादरम्यान सदर संशयिताची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता, हा तरु ण यापूर्वी सिल्वासा येथे कंपनीत कामाला होता. तेथे होणाºया त्रासामुळे १४ दिवस कॉरण्टाइन असल्याचे या तरु णाने वैद्यकीय सूत्रांना सांगितले. त्यानंतर तो हडकाईचोंड येथे आपल्या मूळगावी परतला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सदर संशयित रु ग्णास सुरगाणा ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आले असून, त्याच्या घशाचे स्वॅब पाठविले आहेत.