कोरोना... अन् कोरोनाच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:19 PM2020-04-18T21:19:47+5:302020-04-19T00:37:31+5:30
नाशिक : गेल्या महिनाभरापासून सातत्याने नागरिकांच्या कानावर कोरोना हा एकच शब्द येत असून, त्याचा थेट परिणाम आता बहुतांश नागरिकांच्या मनावर होताना दिसून येत आहे त्यामुळे कोरोना मनोविकार बळावू लागला की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. साधे घशामध्ये खवखवले आणि थोडीशी जरी सर्दी जाणवली तरीदेखील मनामध्ये कोरोना आजाराची शंका बहुतांश लोकांना येऊ लागली आहे.

सातत्याने कोरोना हेच शब्द कानी येऊ लागल्याने आता अनेकांचे मनोधैर्य खचू लागले असून भीती वाढू लागली आहे. मात्र कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित नक्कीच ठेवता येते त्यासाठी स्वयंशिस्त पालन महत्त्वाचे ठरते. आपण हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत, या विचाराने स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.
महिनाभरापूर्वी नाशिक शहर व जिल्ह्याची स्थिती पूर्णपणे वेगळी होती. केवळ कोरोना संशयित रुग्ण आढळून येत होते तेदेखील मोजकेच, मात्र आता स्थिती बदलली आहे. शहरासह जिल्ह्यात ही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन या आजाराला नियंत्रणात नव्हे तर संपुष्टात आणण्यासाठी निकराची झुंज देत आहेत. कठीणसमयी प्रशासनाला साथ देणे गरजेचे आहे. कुठल्याही भीतीपोटी कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्याची गरज नाही.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आपल्या विचारात नकारात्मक भावना येऊ देऊ नये व कुठल्याही नैराश्याला बळी पडू नये, असे शहरातील मनोविकार तज्ज्ञांनी सांगितले.