घंटागाडीतून कोरोना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:55+5:302021-02-27T04:17:55+5:30
मिठाई एक्स्पायरी तारखेचा विसर नाशिक : मिठाई कधी बनविण्यात आली आणि त्यावर एक्स्पायरी तारीख असणे बंधनकारक करण्यात आलेले ...
मिठाई एक्स्पायरी तारखेचा विसर
नाशिक : मिठाई कधी बनविण्यात आली आणि त्यावर एक्स्पायरी तारीख असणे बंधनकारक करण्यात आलेले असतानाही याबाबतची तपासणी होताना दिसत नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाने याबाबतच्या सूचना देण्याची केवळ औपचारिकता पूर्ण केली आहे. कारवाई आणि तपासणी होताना मात्र दिसत नाही.
स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थ उघड्यावरच
नाशिक : शहरातील काही स्वीट मार्ट दुकानदारांकडून खाद्य पदार्थ्यांची काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. स्वीट मार्टमध्ये बनविण्यात आलेले स्नॅक्स हे उघड्यावरच ठेवले जात आहेत. ग्राहकांना या वस्तू देताना देखील कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.
जेलरोड- मानूर मार्गावर प्रवासी वाहतूक
नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे अपेक्षित आहे. यासाठी प्रशासनाने सुरक्षितता नियमाचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र, जेलरोड-नांदूर मार्गावर अनेकदा रिक्षातून जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून येते.
भाजी विक्रेत्यांनी थाटली रस्त्यावर दुकाने
नाशिक : जेलरोड येथील फिलोमिना चर्चसमोरील रस्त्यावर फळ आणि भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन न करता विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटत आहेत. या मार्गावर झाडांची सावली असल्याने दुकानदार या मार्गावर दुकाने मांडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विक्रेत्यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याने येथे ग्राहकांची गर्दीदेखील वाढू लागली आहे.
झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सचा फज्जा
नाशिक : शहर परिसरातील झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. कुठेही सुरक्षितता नियमांचे पालन होताना दिसत नाही. आरोग्यविषयकदेखील रहिवाशांमध्ये बेफिकिरी दिसून येते. परिसरातील रहिवासी घोळक्याने गप्पा मारताना दिसत आहेत, तसेच नळावर पाणी भरण्यासही गर्दी होत आहे. दुकानांमध्ये देखील गर्दी केली जाते.