एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:34 PM2020-07-03T21:34:27+5:302020-07-04T00:30:24+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून कसबे सुकेणेकरांनी रोखून धरलेल्या कोरोनाने अखेर शहरात शिरकाव केला असून आंबारस भोजनासाठी नाशिक येथून आलेल्या पाहुण्यांच्या संपर्कात आल्याने आल्याने एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
कसबे सुकेणे : गेल्या पाच महिन्यांपासून कसबे सुकेणेकरांनी रोखून धरलेल्या कोरोनाने अखेर शहरात शिरकाव केला असून आंबारस भोजनासाठी नाशिक येथून आलेल्या पाहुण्यांच्या संपर्कात आल्याने आल्याने एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
कसबे सुकेणे शहरात कोरोनाच्या प्रवेशाला कसबे सुकेणेकरांनी आजवर रोखून धरले होते. परंतु सुकेणेकरांना ज्याची धास्ती होती तो अहवाल अखेर शुक्र वारी दुपारी धडकला आणि शहरात खळबळ उडाली. कसबे सुकेणे येथील गंगापूर डाव्या कालव्याजवळील सावता नगर येथील संशियत रु ग्णांच्यो घस्याचे नमुने कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तपासणीसाठी पाठविले होते. अहवाल प्राप्त होताच ५५ वर्षीय व २१ वर्षीय पुरु ष आणि ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिघेही बाधित एकाच कुटुंबातील असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली. दरम्यान तिन्हीही रु ग्ण गुरु वारपासून पिंपळगाव बसवंत कोविड केयर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत.
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
मौजे सुकेणे येथे चार आणि कसबे सुकेणेत तीन अशी एकूण रु ग्ण संख्या सातवर जाऊन पोहचली आहे. कसबे आणि मौजे या येथील दैनंदिन व्यवहार एकत्र असून दोन्हीही गावांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कसबे सुकेणे व मौजे सुकेणेत कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतींनी केले आहे.