कोरोनामुळे छायाचित्रकारांचे विस्कटली आर्थिक घडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:58+5:302021-05-09T04:14:58+5:30
चांदोरी : सुख-दु:खात, जल्लोषाच्या कार्यक्रमात छायाचित्रकार इतरांचे क्षण टिपतो, पण कोरोना आणि संचारबंदीमुळे निर्माण झालेली सद्यस्थिती व अडचणीत ...
चांदोरी : सुख-दु:खात, जल्लोषाच्या कार्यक्रमात छायाचित्रकार इतरांचे क्षण टिपतो, पण कोरोना आणि संचारबंदीमुळे निर्माण झालेली सद्यस्थिती व अडचणीत सापडलेला लग्नहंगाम यामुळे छायाचित्रकारांपुढे संकट उभे ठाकले आहे. कोरोनामुळे यंदाचा लग्नहंगामही रद्द झाला आहे. त्यामुळे आर्थिक चक्र विस्कळीत झाले आहे. साहजिकच उपासमारीची वेळ आली असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
छायाचित्रकारांचा प्रमुख आधार असलेला वाढदिवस, लग्न, साखरपुडा आदी कार्यक्रम कोरोनामुळे मागील वर्षभरापासून बंद झाल्याने ग्रामीण भागातील छायाचित्रकार बांधवांच्या चेहऱ्यावरील चिंता गडद झाली आहे. लग्नहंगामातून छायाचित्रकारांना चार पैशांची कमाई होत असते. अशा स्थितीत लग्न हंगामालाच बसलेला फटका छायाचित्रकार बांधवांची आर्थिक घडी विस्कटविणारा ठरतोय.
दरम्यानच्या काळात फोटोग्राफी व्यवसायात होणारे बदल, स्पर्धा, नवनवीन आधुनिक सामग्रीचा होणारा वापर या पार्श्वभूमीवर यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी लग्नहंगामाची तयारी म्हणून नवनवीन साहित्य खरेदी केले. लग्नहंगाम चांगला होऊन आर्थिक उलाढाल झाल्यावर गुंतविलेले पैसे वसूल होतील,अशी आशा बाळगून त्यांनी मागीलवर्षी लग्न ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैवाने कोरोनाचे संकट कोसळून लॉकडाऊन व संचारबंदी सुरू झाली. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी जमावबंदी आवश्यक असल्याने लग्नासारखे समारंभ थांबले. परिणामी छायाचित्रकार अडचणीत सापडले आहेत.
इन्फो
व्यवसायाबाबत अनिश्चितता
यावर्षीतरी मागची कसर निघून जाईल असे वाटले. परंतु, संचारबंदी उठण्याची शक्यता नाही.आतातर महाराष्ट्र शासनाने दोन तासांत लग्न उरकण्याचे आदेश दिल्याने या छायाचित्रकारांना कोणीती ऑर्डर मिळेल,याची शाश्वती नाही.सद्यस्थितीचा विचार करता धुमधडाक्यातील लग्नसमारंभ सुरू व्हायला किती दिवस वाट पहावी लागेल हे अनिश्चित असल्याने छायाचित्रकारांचा व्यवसाय रुळावर येण्यासही वेळच लागणार आहे.
कोट...
अगोदरच मोबाईल फोटोग्राफीमुळे व्यवसाय अडचणीत आला असताना गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे छायाचित्रण कलेचा व्यवसाय अडचणीत आल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
- पिंटू वाळुंज, छायाचित्रकार, चांदोरी
फोटो- फोटोग्राफर अथवा कॅमेऱ्याचा फोटो टाकावा.