जिल्ह्यात कोरोनाने घेतले तब्बल १० बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:55 AM2020-06-29T00:55:44+5:302020-06-29T00:59:05+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. रविवारी नवीन १४४ बाधितांची भर पडण्यासह १० जणांचा बळी गेल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या तब्बल २२५ वर पोहोचली आहे. मृतात ७ नाशिक, येवला, पिंपळगाव बसवंत, देवळाली कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. रविवारी नवीन १४४ बाधितांची भर पडण्यासह १० जणांचा बळी गेल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या तब्बल २२५ वर पोहोचली आहे. मृतात ७ नाशिक, येवला, पिंपळगाव बसवंत, देवळाली कॅम्प येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक १०० रुग्ण महानगरातील आहे. ग्रामीणचे ४२, मालेगावला एक तर जिल्हाबाह्य एक याप्रमाणे १४४ बाधितांची नव्याने भर पडली आहे. रविवारी दाखल नवीन संशयितांमध्ये ३५७ मनपा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय ९, वैद्यकीय महाविद्यालय ३, मालेगाव ३०, ग्रामीण रुग्णालय ११२, तर गृहविलगीकरण कक्षातील ४३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये सध्या १५१७ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
येवला,पिंपळगावी सहा पॉझिटिव्ह
शहरात कोरोना- बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी चार
रु ग्ण पॉझिटिव्ह आले असताना रविवारी पुन्हा ६ जण बाधित असल्याचा अहवाल आल्याने रु ग्णसंख्या ३६ झाली आहे.
सिन्नरची रुग्णसंख्या ९९
सिन्नर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालल्याने आरोग्य विभागावर ताण वाढत चालला आहे. रविवारी दुपारी १५
रु ग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने सिन्नर तालुक्यातील रु ग्णसंख्या ९९ झाली असून, तालुका शंभरीच्या उंबरठ्यावर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
बागलाणला चार बाधित
बागलाण तालुक्याच्या अन्य भागातही बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि.२८) पुन्हा चार कोरोना- बाधित आढळून आले. ब्राह्मणगाव परिसरात प्रथमच बाधित आढळल्याने प्रशासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
देवळ्यात दोघे पॉझिटिव्ह
ग्रीन झोनमध्ये असलेल्या देवळा तसेच खुंटेवाडी येथे प्रत्येकी एक अशा दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत देवळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये पाच व्यक्तींसह एकूण सात जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. याशिवाय बाधिताच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आरोग्य यंत्रणेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. निफाड, नांदगावला वाढीव बेड्स
येवल्यातील बैठकीमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला, निफाड आणि नांदगावमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या तालुक्यांमध्ये अतिरिक्त बेड्सचे तत्काळ नियोजन करण्याचे आदेश दिले. कोरोनाला रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांशी संवाद साधून या प्रक्रियेत त्यांचीही मदत घेण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले.