नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थिती अल्प प्रमाणात कोरोना वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 08:55 PM2021-02-17T20:55:17+5:302021-02-18T00:17:30+5:30
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवाळीपर्यंत कमी होऊ लागली होती. दीपोत्सव पर्वानंतर काही दिवस पुन्हा रुग्णसंख्येत अल्पशी वाढ दिसली होती.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवाळीपर्यंत कमी होऊ लागली होती. दीपोत्सव पर्वानंतर काही दिवस पुन्हा रुग्णसंख्येत अल्पशी वाढ दिसली होती.
मात्र, त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्या १५० च्या आसपास राहिली. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या १० तारखेला प्रथमच बाधित संख्या २००नजीक म्हणजे १९३ पर्यंत पोहोचली. ११ फेब्रुवारीला २०६ तर १२ फेब्रुवारीला ३००नजीक अर्थात २९६ पर्यंत पोहोचली आहे. तर १५ फेब्रुवारीलादेखील बाधितांचा आकडा २०४ असा पोहोचलेला आहे.
त्यामुळे काही प्रमाणात तरी कोरोना वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमध्ये दक्षता घेण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच महाविद्यालये नुकतीच सुरू झाली असल्याने तिथे फारशी गर्दी होत नसल्याने त्यामुळे कोणताही विशेष फरक पडलेला नाही. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने जनजागृतीचे काम सुरूच असले तरी अनेक नागरिक मार्गदर्शक तत्त्वांचा विसर पडल्यासारखेच वावरत आहेत.