स्थानिक अधिकाऱ्यांमुळे कोरोनावर नियंत्रण : शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:10 PM2020-08-12T22:10:17+5:302020-08-13T00:08:37+5:30
मालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव मध्य : मनपा, स्थानिक आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांनी केलेली प्रार्थना यामुळेच शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांनी उगीच स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नये, असे माजी महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेख म्हणाले की, शहरात कोरोनाच्या उद्रेकावेळी महापालिका प्रशासन, आरोग्य अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका, आशा वर्कर्स यांचे योगदान शासनाच्या दबावामुळे शहरातील लहान-मोठ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडून केलेले उपचार व रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांनी केलेली दुवा याचे फलित म्हणून कोरोना नियंत्रणात आला. याचे स्पष्ट श्रेय हे स्थानिक यंत्रणा व नागरिकांचेच आहे; परंतु राष्टÑवादीचे खासदार शरद पवार यांच्यासमोर जिल्हास्तरीय अधिकाºयांनी आपल्यामुळेच कोरोनावर मात मिळाली हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे पूर्णत: सत्य नाही, असा खुलासा केला. आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा निधी सामान्य रुग्णालयासाठी वापरण्यात आला. त्याचा मनपास कुठलाही लाभ झालेला नाही, असे स्पष्ट करीत आमदारांनी शहराची दिशाभूल करू नये, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.
शासनाकडून मनपासाठी निधी मिळावा यासाठी अर्थमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली; परंतु शासन कर्ज काढून कर्मचाºयांचे वेतन अदा करीत असल्याचे सांगत मनपास कुठलाही निधी देण्यास स्पष्ट नकार दिला. लॉकडाऊनमुळे मनपाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला असून करपट्टी, पाणीपट्टी, इतर उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले. त्यातच कोरोनावर खर्च सुरूच असल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सोयीसुविधांसाठी मोर्चे, धरणे देवून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला माजी महापौर शेख यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीत ३० हजार बोगस मतदान झाल्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये गत आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याकडे लक्ष वेधले असता शेख म्हणाले की, अपयशी ठरलेल्या उमेदवारांने पराजय स्वीकारणे आवश्यक आहे तर विजयी उमेदवारानेही सत्य पचवून घेण्याची क्षमता अपेक्षित आहे. शहरात एकाच व्यक्तीचे दोन - तीन ठिकाणांवर मतदान असल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. त्यामुळे मतदार यादी आधार कार्डशी जोडणी करावी, अशी मागणी करून शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी शहरातून हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क लावावा. सामाजिक अंतराचे पालन करुन आवश्यक ती खबरदारी घेवून स्वत:सह शहराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन शेख रशीद यांनी केले.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व शहरातील स्वच्छता व उपाययोजना करण्यासाठी १४ व्या वित्त आयोग व जनरल फंडमधून मनपाने आजपर्यंत सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले असून त्यापैकी एक कोटी ८८ लाख ६८ हजार ३६१ रूपये अदाही केले आहे. शासनाने फक्त २० लाख रूपये मनपास दिले आहे. त्यामुळे मनपाने स्वत:चा निधी खर्च केला असल्याचे सांगितले.