यंदा बैलपोळा सणावर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 05:45 PM2020-08-16T17:45:16+5:302020-08-16T17:45:58+5:30
देशमाने : दोन दिवसावर आलेल्या बैलपोळा सणावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या आपल्या बैल व गाय यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देशमाने : दोन दिवसावर आलेल्या बैलपोळा सणावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या आपल्या बैल व गाय यांच्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे.
शेती व शेतकऱ्यांवर कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ओढाताण होत असताना देखील कुटूंबातील एक घटक असलेल्या बैलांचा सण अवघा दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. ग्रामिण भागात अद्यापही छोट्या शेतकऱ्यांकडे शेती व कुटूंब उदरनिर्वाहासाठी बैल व गायींचे संगोपन केले जात आहे.
वर्षातून एकदाच येणाºया सणासाठी यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकºयांची ओढाताण होत असताना दिसून येत आहे. दोन दिवसावर आलेल्या बैलपोळा सणासाठी उधार उसनवारी करत आवश्यक असलेले कासरे, माठवट, वेसण, मोहरकी, हिंगुळ, आॅईलपेंट रंग, चवर, गोंडे आदी साहित्य खरेदी करताना दिसत आहे.
चौकट -
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी बैलशोभेसाठी लागणारे माठवट व मोहरकी व कासरे आदी साहित्य बनविण्यासाठी खूपच कमी प्रमाण आहे. यापूर्वी सुमारे मिहनाभर माङयाकडे शेतकरी आवश्यक साहित्य आणून देत. यातून मला पंधरा ते वीस हजार रु . मजुरी मिळत होती. यंदा मात्र पाच हजार रु पये देखील मिळणे मुश्किल आहे.
- काशीनाथ त्रिभुवन, सुत कारागीर, देशमाने (बु)