गुलाब शेतीवर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:02 PM2020-07-11T21:02:42+5:302020-07-12T02:01:01+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील गुलाब शेती कोरोनामुळे संकटात सापडली असून, व्यापाऱ्यांची मागणी नसल्याने लाखो रुपयांचे गुलाब फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील गुलाब शेती कोरोनामुळे संकटात सापडली असून, व्यापाऱ्यांची मागणी नसल्याने लाखो रुपयांचे गुलाब फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जानोरी परिसरात सध्या शंभर ते दीडशे पॉलिहाउस आहे. तसेच खुली गुलाब शेती भरपूर आहे. जानोरी येथील ज्ञानेश्वर डवणे या शेतकºयाने लाखो रु पये खर्च करून सात एकर शेतामध्ये नेट हाउस व ओपन गुलाब शेती तयार केली आहे. या शेतकºयाने सुरुवातीला आपले चांगल्या पद्धतीने शेत तयार करून घेतले. नंतर पुणे येथून लाखो रुपयांचे गुलाब रोपे आणून लागवड केली. यानंतर या रोपांना औषध फवारणी करणे, अनेक प्रकारचे खते टाकले. मोठा खर्च करून गुलाब शेती तयार केली.
सध्या शेतातील सर्व गुलाब फुले विक्रीसाठी तयार आहेत. परंतु कोरोनामुळे पुणे, मुंबई, नाशिक, इंदूर, दिल्ली येथील व्यापाºयांनी मागणी बंद केल्याने या शेतकºयाला लाखो रुपयांचे गुलाब फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. तसेच या शेतकºयांकडे गुलाब शेती कामासाठी वीस ते पंचवीस मजूर काम करीत आहेत. यामध्ये काही मजूर दररोज सकाळी येऊन फुले तोडून ते पाण्यात ठेवणे.
काही मजूर चांगल्या फुलांची प्रतवारी करून वीस फुलांचा बंडल तयार करून बॉक्समध्ये ठेवण्यासाठी, तर काही मजूर औषधे फवारणी, खते टाकणे असे अनेक प्रकारचे कामे करतात. मजुरांना पगार कसा द्यावा या चिंतेत शेतकरी सापडले आहेत. कोरोनामुळे प्रत्येक शहरात लॉकडाऊन असल्याने गुलाबाच्या फुलांना कुठेच मागणी नसल्याने या मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
-----------------
पंधरा एकर गुलाब फुले विक्र ीसाठी तयार आहेत. पण भारतात कुठेही फूल मार्केट खुले नसल्याने या गुलाब फुलांचे काय करावे, असा प्रश्न पडला आहे. वीस फुलांचा बंडल पाच रु पयांना विकत नाही. दोन हजार रु पयांचादेखील माल अद्याप विकलेला नाही. त्यामुळे मार्केट कधी खुले होईल आणि गुलाबाला मागणी वाढेल याची प्रतीक्षा लागली आहे. मागणी न झाल्यास सर्व फुले फेकून देण्याची वेळ येणार असून, मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
- ज्ञानेश्वर डवणे, शेतकरी