दिंडोरी तालुक्यांचा कोरोना रु ग्णाचा आलेख चढता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 04:48 PM2020-07-05T16:48:32+5:302020-07-05T16:48:57+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोरोना रु ग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.आता तालुक्यातील रग्ण संख्या जवळ जवळ ४३ च्या वर पोहोचली आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोरोना रु ग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.आता तालुक्यातील रग्ण संख्या जवळ जवळ ४३ च्या वर पोहोचली आहे.
बोपेगाव-३, मोहाडी-२, पिंपळगाव केतकी -१, दिंडोरी शहर -१ ,लखमापूर-१ असे रग्ण दोन दिवसात वाढले असून आता दिंडोरी तालुक्यात कोरोना रु ग्णांचा आलेख वाढत असुन जवळ जवळ ५२ च्या वर गेलेला असल्यामुळे प्रशासकीय यंञणेची धावपळ होत आहे.
दिंडोरी तालुका कोरोना मुक्त होता. परंतु अचानक रग्ण वाढत चालल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे. आता पर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव नव्हता. परंतु शासनाने दिलेले नियम जनतेमधुन काटेकोरपणे न पाळल्यामुळे कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव गेल्याचे बोलले जात आहे. कोरोना फैलाव हा ग्रामीण भागात नाशिक भाजीपाला च्या माध्यमातून होत आहे. तालुक्याच्या बरीच गावे ही आता सील करण्यात आली आहे. बाहेरून येणारी व्यक्ती यांची पुर्ण चौकशी करून नंतर त्याला सोडले जात आहे.
लखमापूर मध्ये जो रग्ण सापडला आहे. ते मुळचे शिरडीचे असुन ते लखमापूर ला आपल्या नातेवाईकांकडे आलेले आहे. लखमापूर मध्ये आता पर्यंत एकही रग्ण नव्हता. परंतु एक रग्ण सापडल्यामुळे सर्व यंत्रणा जागरूक झाली आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी संजय पाटील, तलाठी नंदकुमार गोसावी व लखमापूर आरोग्य अधिकारी डॉ.देवरे व त्याचे सर्व कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, आशा कर्मचारी इ. प्रयत्नशील आहे.
जनतेने अजुन ही वेळ गेलेली नाही. शाशासनाच्या नियमांचे जनतेने काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोणी घराबाहेर विना कारण फिरत असेल व तोंडाला मास्क नसेल तर १०० रू दंड आकारण्यात येईल .तेव्हा जनतेने जागरूक राहावे.
- संजय पाटील, ग्राम विकास अधिकारी, लखमापूर
जनतेने या साथीच्या रोगाबद्दल गुप्तता न ठेवता. जागरूक राहावुन शासनास मदत करावी. तसेच जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता शासनाने जे नियम ठरवून दिलेले आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे. व जनतेने घाबरून न जाता जागरूक राहावे.
-डॉ कोशिरे, तालुका आरोग्य अधिकारी दिंडोरी तालुका.