कोरोनाने वाढविला कौटुंबिक कलह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:42+5:302021-04-25T04:13:42+5:30
बहुतांश कुटुंबांमध्ये दररोज भांडण, कलह होताना पहावयास मिळत आहेत. यामागे पुरुषांवर असलेला कार्यालयीन कामाचा अतिरिक्त ताण आणि घरातील कामांमध्येही ...
बहुतांश कुटुंबांमध्ये दररोज भांडण, कलह होताना पहावयास मिळत आहेत. यामागे पुरुषांवर असलेला कार्यालयीन कामाचा अतिरिक्त ताण आणि घरातील कामांमध्येही झालेली वाढ आणि त्यामुळे महिलांवर येणारा ताण आणि दोघांची होणारी चिडचिड यामुळे अनेक कुटुंबांमध्ये सकाळ-संध्याकाळ ‘खटके’ उडत असल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील एका भागात तर चक्क शेजाऱ्याने माझ्या कुंडीतील जास्वंदाच्या झाडाचे फुल का तोडले? यावरून भांडण उफाळून आले आणि पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. घरातील पुरुष, मुले, ज्येष्ठ नागरिक सर्वच अधिकाधिक वेळ घरातच थांबून राहत असल्याने घरातील महिलांवर कामाचा ताणही वाढून त्यांची चिडचिड होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक कुटुंबीयांनी तर मोलकरिणींना ‘रजा’ घेण्यास भाग पाडले आहे. यामुळे घरातील सर्वच प्रकारच्या कामांचा बोजा महिलांवर येऊन पडला आहे. महिला सुरक्षा शाखा व महिला समुपदेश केंद्रात अशाप्रकारे किरकोळ भांडणांवरून विभक्त होण्याचा दोघांनी निर्णय घेत तक्रार अर्ज दाखल करण्याचे प्रमाण या तीन महिन्यांत वाढले आहे.
---इन्फो----
मोबाईलवर तासनतास बाेलणे...अन् भांडणाला निमंत्रण
घरात काम करताना बहुतांश पुरुषांना मोबाईलवरून अधिक बोलावे लागत असल्याने हेदेखील एक भांडणाचे कारण ठरते. नोकरदारांच्या वेतनकपात करण्यात आल्याने घरात पैशांच्या चणचणीमुळेही वादविवाद होत आहे.
रोजंदारीचे काम असो किंवा लहान-मोठी कामे अथवा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या घरांमध्येही पैशांच्या चणचणीमुळे वादविवाद होत आहेत.
बहुतांश कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोघेही नोकरीला असल्यामुळे अशा पत्नींची तारेवरची कसरत होऊ लागली आहे. कारण कार्यालयीन कामाचा वाढता ताण आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजा यांचा मेळ साधताना त्यांची होणारी दमछाक यामुळेही कलह वाढीस लागत आहे.
---कोट--
पती-पत्नींनी एकमेकांना या कठीण काळत सांभाळून घेत मानसिक स्थिती समजून घेण्यावर भर द्यायला हवा. जेणेकरून संसाराची घडी विस्कटण्याचा धोका उद्भवणार नाही. कोरोनाचे संकट हे दीर्घकालीन नसून या संकटावर नक्कीच मात करण्यास माणसाला यश येईल. मात्र, पती-पत्नींचे नाते आयुष्यभराचे असून या प्रसंगात दोघांना एकमेकांचा आधार अन् खंबीर साथ गरजेची आहे, हे दाम्पत्यांनी लक्षात घेतल्यास कौटुंबिक कलह नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. मृणाल भारद्वाज, मानसोपचारतज्ज्ञ
--
डमी फॉरमेट आर वर २४ डिवोर्स इन कोरोना नावाने आणि फोटो २४डिवोर्स१ नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
240421\24nsk_19_24042021_13.jpg~240421\24nsk_20_24042021_13.jpg
===Caption===
कौटुंबिक कलह वाढला~कौटुंबिक कलह वाढला