जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:43 PM2021-03-18T23:43:18+5:302021-03-19T01:33:49+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी कहर केला असून, बाधित संख्येचा पुन्हा भयावह विस्फोट झाला आहे. गुरुवारी (दि. १८) दिवसभरात तब्बल २४२१ इतके बाधित रुग्ण आढळले असून, हा एकाच दिवसातील बाधितांचा सर्वात मोठा उच्चांक ठरला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर चिंतेच्याही पुढे पोहोचली असल्याने खूप मोठे संकट घोंगावू लागले आहे.

Corona explodes again in the district! | जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट !

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट !

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारपार ; दिवसभरात तब्बल २४२१ बाधित

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी कहर केला असून, बाधित संख्येचा पुन्हा भयावह विस्फोट झाला आहे. गुरुवारी (दि. १८) दिवसभरात तब्बल २४२१ इतके बाधित रुग्ण आढळले असून, हा एकाच दिवसातील बाधितांचा सर्वात मोठा उच्चांक ठरला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर चिंतेच्याही पुढे पोहोचली असल्याने खूप मोठे संकट घोंगावू लागले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी तब्बल २४२१ बाधित रुग्ण, तर ८८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २ आणि ग्रामीणला २ असे एकूण ४ जणांचे बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २१९७वर पोहोचली आहे. गत वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात कोरोनाबाधितांची दररोजची संख्या साधारणपणे दीडशेच्या आसपास आली होती. त्यामुळे नूतन वर्षात नाशिक कोरोनामुक्त होण्याची आशा वाटू लागली होती. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हे चित्र कायम होते. मात्र, दरम्यानच्या काळातील लग्नसोहळे आणि उत्सवी वातावरणामुळे तसेच जनतेत कोरोनाबाबत आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले. आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यात बुधवारी आणि गुरुवारी असे सलग दोन दिवस कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांवर राहिल्याने सामान्य नागरिकांनीदेखील विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

नाशिक मनपा क्षेत्रात १२९६
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात बुधवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १२९६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळल्याने नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाची सर्वाधिक दहशत निर्माण झाली आहे.

सलग दोन हजारावर प्रथमच
गतवर्षी सर्वाधिक कोरोना रुग्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात सापडले होते. मात्र, त्यावेळीदेखील सलग दोन दिवस बाधित संख्या दोन हजारांच्या आकड्याला ओलांडून गेली नव्हती. त्यावेळी सप्टेंबर महिन्यात एकदाच २०४८ इतके कोरोना रुग्ण बाधित आढळले होते. त्यानंतर बाधितांची संख्या सातत्याने खालीच आली होती.

रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांखाली
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर मागील महिन्यापर्यंत ९८ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णवाढ अधिक आणि कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण कमी यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर काही प्रमाणात घसरू लागला. मात्र, गत आठवड्यापासून तर कोरोनामुक्त रुग्णांचा दर दिवसाला एक टक्क्याच्या आसपास दराने घसरू लागल्याने गुरुवारी हा दर ९० टक्क्यांखाली म्हणजे ८९.६५वर पोहोचला आहे.

Web Title: Corona explodes again in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.