कोरोनामुळे धुळवडीचा रंग पडला फिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 01:01 AM2021-03-30T01:01:36+5:302021-03-30T01:01:54+5:30
होळी किंवा धुळवड म्हणजे सर्वांसाठीच आनंदाचा आणि रंगांचा उत्सव, परंतु, यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले. शहरात दरवर्षी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, सिडको भागात उत्तर भारतीय कुटुंबीयांकडून एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात होळी अर्थात धुळवड सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नागरिकांनी एकत्र न येता घरातच कुटुंबीयांसमवेत रंग खेळत गोड पदार्थ तयार करून होळीचा (धुळवडीचा) सण साजरा केला.
नाशिक : होळी किंवा धुळवड म्हणजे सर्वांसाठीच आनंदाचा आणि रंगांचा उत्सव, परंतु, यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले. शहरात दरवर्षी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, सिडको भागात उत्तर भारतीय कुटुंबीयांकडून एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात होळी अर्थात धुळवड सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नागरिकांनी एकत्र न येता घरातच कुटुंबीयांसमवेत रंग खेळत गोड पदार्थ तयार करून होळीचा (धुळवडीचा) सण साजरा केला.
देवळालीत सर्वधर्मीयांचे धूलिवंदन
धूलिवंदन सण देवळाली कॅम्प परिसरात कोरड्या रंगाची उधळण करत साजरा करण्यात आला. यावेळी उत्तर भारतीयांसह जैन, सिंधी बांधवांसह सर्व धर्मीयांनी एकमेकांना कोरडा रंग लावत पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. नागरिकांनी कुठेही एकत्र न येता एकमेकांना रंगाने माखवताना पर्यावरणपूरक रंगाचा वापर करीत कोरडी धुळवड साजरी करत आनंद लुटला. जैन बांधवांच्या विविध आरोग्य धाममध्ये पर्यावरणपूरक रंगाची उधळण करत तरुणाई व बच्चे कंपनीने पाण्याचे फुगे उडवत एकमेकांना रंगाने भिजवले. जुन्या बसस्थानक येथे नागरिकांसह येथील लष्करी भागात परंपरेप्रमाणे होळी खेळण्यात आली.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात साधेपणा जाणवत होता. कुठेही नियमाचा भंग होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी सर्व जाती, धर्माचे लोक एकत्र येऊन संपूर्ण शहरात रंगाची उधळण करतात. यंदा मात्र हा प्रकार कुठेही दिसला नाही. देवळाली कॅम्प पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीत याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन नागरिक करताना दिसत होते.
(फोटो डेस्कॅनवर)