पेठ तालुक्यात कोरोना कुटुंब सर्वेक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:59+5:302021-04-29T04:10:59+5:30

आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षक यांच्या पथकामार्फत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येत असून यामध्ये तापमान, ...

Corona family survey started in Peth taluka | पेठ तालुक्यात कोरोना कुटुंब सर्वेक्षणास प्रारंभ

पेठ तालुक्यात कोरोना कुटुंब सर्वेक्षणास प्रारंभ

googlenewsNext

आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षक यांच्या पथकामार्फत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येत असून यामध्ये तापमान, ऑक्सिजन लेव्हल, दिसून आलेली लक्षणे याबाबत माहिती संकलित करून संशयित रुग्णांना नजीकच्या कोविड सेंटरला संदर्भित करण्यात येत आहे.

पेठ तालुक्यात गत एक वर्षापासून कोरोना नियंत्रणात असताना दुसऱ्या लाटेत मार्चपासून अचानक रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने ‘डोअर टू डोअर’ सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसून आल्यास तात्काळ तपासणी करून वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, बालविकास प्रकल्पाधिकारी विलास कवाळे यांनी केले आहे.

इन्फो

एकूण महसुली गावे - १४५

आरोग्य कर्मचारी - १४०

आशा स्वयंसेविका -१६८

अंगणवाडी सेविका - २३५

प्राथ/माध्य. शिक्षक - ४५३

फोटो- २८ पेठ सर्वे

पेठ तालुक्यात सुरू असलेले कोविड कुटुंब सर्वेक्षण.

===Photopath===

280421\28nsk_6_28042021_13.jpg

===Caption===

फोटो- २८ पेठ सर्वे पेठ तालुक्यात सुरू असलेले कोवीड कुंटुब सर्वेक्षण. 

Web Title: Corona family survey started in Peth taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.