कोरोनाने कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:57 PM2020-07-10T23:57:14+5:302020-07-11T00:21:20+5:30
कोरोनाच्या धसक्यामुळे जिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालये बहुतांश खासगी रुग्णालयांमध्येदेखील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.
नाशिक : कोरोनाच्या धसक्यामुळे जिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय
रुग्णालये बहुतांश खासगी रुग्णालयांमध्येदेखील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.
एकीकडे कुटुंब नियोजन करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागरण मोहिमा होत असताना कोरोनामुळे या शस्त्रक्रि या बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्हा रुग्णालयासह महापालिकेचा अन्य
रुग्णालयांमध्येदेखील सध्या केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. ज्या शस्त्रक्रिया काही कालावधीनंतर करणे शक्य आहे, अशा नियोजित शस्त्रक्रि या कोरोनाचा कहर थांबेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि यांचादेखील अंतर्भाव करण्यात आला आहे. अर्थात शस्त्रक्रि या केल्या जात नसल्या तरी अन्य गर्भनिरोधक पर्याय वापरून योग्य त्या सूचना संबंधित महिला आणि
पुरुषांना दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे गत पाच वर्षांत कुटुंब नियोजनाच्या एक लाख ३७ हजार ६८८ शस्त्रक्रि या झाल्या असून, त्यात पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रि यांचे प्रमाण ७६८१ इतकेच आहे. पुरु ष नसबंदीबाबत मोठ्या प्रमाणात प्रचार करूनदेखील त्याचा फारसा उपयोग झालेला नसल्याचे गत पाच वर्षांतील आकडेवारीतून दिसून येते. गेल्या पाच वर्षांत पुरु ष नसबंदीचे प्रमाणही घसरले आहे. कुटुंब नियोजनासाठी महिलावर्गाला पुढाकार घ्यावा लागतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कुटुंब नियोजन करण्यात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण आता नगण्य झाले आहे. त्यामुळे या मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामधील अडचणी काही प्रमाणात दूर होत आहे.
नुकसानभरपाई योजना
कुटुंब कल्याण शस्त्रक्रि येसंदर्भात २००५ मध्ये दाखल केलेल्या एका याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसारच देशात सर्व ठिकाणी कुटुंब नियोजन विमा योजना लागू करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने २०१३ मध्ये कुटुंब नियोजन नुकसानभरपाई योजना सुरू केली. आता त्यातही पुन्हा नव्याने काही बदल करण्यात आले आहेत.