कोरोनामुक्त ११७७; बळी ३३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:52+5:302021-05-24T04:14:52+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३५४ तर नाशिक ग्रामीणला ७२० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७६ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २२, मालेगाव मनपाला २ असा एकूण ३३ जणांचा बळी गेला आहे. शनिवारी अचानकपणे मृतांची संख्या पन्नासवर गेल्यानंतर रविवारी मृतांची संख्या पुन्हा तीसवर आली आहे. बळींमध्ये काहीशी घट झाली असली, तरीही नागरिकांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे.
इन्फो
ग्रामीणला बळी दुपटीहून अधिक
जिल्ह्यात मृत्यूंच्या संख्येत सातत्याने नाशिक शहरच आघाडीवर राहात होते. मात्र, गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा तुलनेत नाशिक शहरापेक्षा अधिक राहू लागला आहे. रविवारीही ग्रामीणमधील मृतांची संख्या २२ असून, शहरातील ९ बळींच्या तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे.