जिल्ह्यातील २८७ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:45 AM2020-11-28T01:45:03+5:302020-11-28T01:45:30+5:30

नाशिक जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २६) नवीन ३५० रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३, तर जिल्हाबाह्य १ याप्रमाणे एकूण ४ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १,७८२वर पोहोचली आहे.

Corona free 287 patients in the district | जिल्ह्यातील २८७ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यातील २८७ रुग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देदिलासा : ३५० रुग्ण नव्याने बाधित

नाशिक : जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २६) नवीन ३५० रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३, तर जिल्हाबाह्य १ याप्रमाणे एकूण ४ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १,७८२वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १७२वर पोहोचली असून, त्यातील ९५ हजार ६२६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर २,७६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.४६वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.३९, नाशिक ग्रामीण ९३.७४, मालेगाव शहरात ९३.५२, तर जिल्हाबाह्य ९१.६४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २७६४ बाधित रुग्णांमध्ये १४८५ रुग्ण नाशिक शहरात, ११४५ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १०८ रुग्ण मालेगावमध्ये, तर २६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ७७ हजार ०५६ असून, त्यातील दोन लाख ७५ हजार ५०७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १७२ रुग्ण बाधित आढळून आले असून, १,३७७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: Corona free 287 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.