कोरोनामुक्त ३५८३; बळी ३२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:31+5:302021-05-05T04:23:31+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवारी (दि.३) काहीशी घट होऊन २७२० इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवारी (दि.३) काहीशी घट होऊन २७२० इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३५८३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३६०० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ११८४ तर नाशिक ग्रामीणला १४२० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ८३ व जिल्हाबाह्य ३३ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ७, ग्रामीणला २५ असा एकूण ३२ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास होती. त्यात काहीशी घट झाली असली, तरीही नागरिकांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे.
इन्फो
उपचारार्थी ३६ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सलग सहाव्या दिवशी अधिक आली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३६,०११ वर पोहोचली आहे. त्यात १८ हजार ४१८ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १५ हजार ७२१ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ६१७ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य २५५ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
ग्रामीणला बळी तिपटीहून अधिक
जिल्ह्यात मृत्युच्या संख्येत सातत्याने नाशिक शहरच आघाडीवर राहत होते. मात्र, गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा तुलनेत नाशिक शहरापेक्षा अधिक राहू लागला आहे. सोमवारीही ग्रामीणमधील मृतांची संख्या २५ असून, शहराच्या ७ बळींच्या तुलनेत ही संख्या तिपटीहून अधिक आहे.