बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:58+5:302021-05-29T04:12:58+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ९८५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २,९३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ...

Corona-free triple compared to infected | बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट

बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत ९८५ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २,९३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३९ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,५८९ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४२४, तर नाशिक ग्रामीणला ४३३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २० रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, तर ग्रामीणला २४ असा एकूण ३९ जणांचा बळी गेला आहे. शहरातील बळींमध्ये काहीशी घट झाली असली, तरीही ग्रामीणच्या बळींमध्ये शहराच्या तुलनेत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र नवीन कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त तिप्पट झाल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत घट येऊन ती संख्या ११९८७ वर आली आहे.

इन्फो

ग्रामीणला बळी दीडपटीहून अधिक

जिल्ह्यात मृत्यूंच्या संख्येत सातत्याने गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा वाढला होता. त्यानंतर काही दिवस पुन्हा शहरातील बळीसंख्येत वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी पुन्हा बळींमध्ये ग्रामीण भाग नाशिक शहरापेक्षा पुढे गेला आहे. शुक्रवारीही ग्रामीणमधील मृतांची संख्या २४ असून, शहरातील १५ बळींच्या तुलनेत ही संख्या दीडपटीहून अधिक आहे.

Web Title: Corona-free triple compared to infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.