कोरोनामुळे शैक्षणिक दाखल्याची प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 06:56 PM2020-06-15T18:56:56+5:302020-06-15T19:04:30+5:30
दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशासाठी शैक्षणिक दाखल्यासाठी ई-सेवा केंद्रावर गर्दी होते. तर प्रांत कार्यलयातून विद्यार्थ्यांना दाखले वितरित केले जातात. परंतु,दरवर्षी जून मध्ये वितरीत होणाऱ्या शैक्षणिक दाखल्याच्या प्रकियेला यंदा करोना मुळे विलंब झाला आहे.
नाशिक : दरवर्षी जून मध्ये वितरीत होणाऱ्या शैक्षणिक दाखल्याच्या प्रकियेला यंदा करोना मुळे विलंब झाला आहेच. त्याशिवाय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलला देखील कोणताही प्रतिसाद मिळू शकला नसल्याने यंदा विद्यार्थी दाखल्याची प्रक्रिया विलंबाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशासाठी लागणाऱ्या शैक्षणिक दाखल्यासाठी ई-सेवा केंद्रावर गर्दी होते. तर प्रांत कार्यलयातून विद्यार्थ्यांना दाखले वितरित केले जातात. त्यामुळे जून महिन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी मोठी लगबग असते. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट,नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आधी दाखल्याची गरज असते. साधारणपणे दोन ते अडीच लाख दाखले दरवर्षी विद्यार्थ्यांना वितरित केले जातात. यंदा मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे संपूर्ण शिक्षण यंत्रणा ठप्प झाल्याने दहावी बारावीचा निकाल रखडला आहे.त्यामुळे सहाजिकच प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी देखील अर्ज प्रक्रिया होऊ शकलेली नाही. लॉकडाऊन मुळे सर्वत्र बंद असल्याने या काळात या काळात ई-सेवाकेंद्र देखील बंद ठेवण्यात आली होती अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाइन दाखल्यासाठी पोर्टलची लिंक विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. विद्यार्थी घरबसल्या साठी अर्ज करू शकतील यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेवा पुरविण्यात आल्या. मात्र गेल्या महिन्याभरात एकाही विद्यार्थ्याने ऑनलाइन अर्ज सादर केलेला नाही. त्यामुळे यंदा दाखल्यांची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मागील वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले शाळेतच दिले जाण्याची प्रक्रिया राबविली जाईल असे जाहीर केले होते. मात्र काही महाविद्यालयांमध्ये च सदर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली. लाखो विद्यार्थ्यांना शाळेतूनच दाखले देण्याबाबत प्रक्रिया राबविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होत नसल्याने यंदाही विद्यार्थ्यांपर्यंत दाखले पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी पोर्टल ची लिंक देण्यात आली होती; त्याचाही उपयोग झाला नसल्याने प्रत्यक्ष निकालानंतर दाखल्यांसाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.