कोरोनाचे येवल्यात २६ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 08:56 PM2021-03-15T20:56:28+5:302021-03-16T00:43:38+5:30
येवला : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील २६ संशयितांचे अहवाल सोमवारी (दि. १५) पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी, येवला शहरातील पहिलवान गल्ली, विठ्ठलनगर येवला, बदापूर रोड येथील १३ बाधितांचा समावेश आहे.
येवला : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील २६ संशयितांचे अहवाल सोमवारी (दि. १५) पॉझिटिव्ह आले आहेत.
बाधितांमध्ये राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी, येवला शहरातील पहिलवान गल्ली, विठ्ठलनगर येवला, बदापूर रोड येथील १३ बाधितांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील कुसुर येथील ३, मातुलठाण, अंदरसुल, पिंपळखुटे ३, नेऊरगाव येथील प्रत्येकी १, सावरगाव येथील ४, चिचोंडी खुर्द येथील २ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या १४०८ झाली असून आतापर्यंत १२२६ कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाने आतापर्यंत ५४ जणांचा बळी घेतला आहे. सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या १३९ झाली आहे.