कोरोनाबाधित पावणेदोन वर्षांनी शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 02:22 AM2022-03-22T02:22:06+5:302022-03-22T02:22:24+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दोन वर्षांपूर्वी २९ मार्चला आढळून आल्यानंतर मे महिन्यापासून दररोज किमान काही रुग्ण बाधित आढळून येत होते. साधारण पावणेदोन वर्षांनी २१ मार्चला जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे नाशिक कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

Corona-infested at zero after two years | कोरोनाबाधित पावणेदोन वर्षांनी शून्यावर

कोरोनाबाधित पावणेदोन वर्षांनी शून्यावर

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दोन वर्षांपूर्वी २९ मार्चला आढळून आल्यानंतर मे महिन्यापासून दररोज किमान काही रुग्ण बाधित आढळून येत होते. साधारण पावणेदोन वर्षांनी २१ मार्चला जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे नाशिक कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

जिल्ह्यात प्रदीर्घ कालावधीनंतर नवीन रुग्ण न आढळण्याची घटना घडल्याने आरोग्य विभागालाही काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना उपचारार्थी संख्या आता अवघी ६६ पर्यंत खाली आली आहे. मात्र, कोरोना प्रलंबित अहवाल २७५ आहेत. दरम्यान, कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९८.१२ टक्के असून, कोरोना पाॅझिटिव्हिटी दर थेट शून्यावरच आला आहे. दरम्यान, गत आठवड्यापासून जिल्ह्यात एकही बळी गेला नसल्याने बळींची संख्या ८८९९ वर कायम आहे.

Web Title: Corona-infested at zero after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.