निफाड शहरात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:24 PM2020-06-11T22:24:43+5:302020-06-12T00:26:28+5:30
निफाड : कोरोनापासून अद्याप लांब असलेल्या निफाड शहरात मुंबईहून आलेला नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने शहरात धास्तीचे वातावरण पसरले आहे.
निफाड : कोरोनापासून अद्याप लांब असलेल्या निफाड शहरात मुंबईहून आलेला नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने शहरात धास्तीचे वातावरण पसरले आहे.
सदर बाधित रुग्ण मुंबई येथे नोकरीस असून, त्याचे कुटुंबीय निफाडला राहते. तो निफाड येथे दि. २८ मे रोजी आला होता. त्यानंतर त्याची दि. २९ मे रोजी निफाडच्या रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्यास होम क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. काही दिवसांनी डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्याने निफाडला दोन खासगी डॉक्टरकडे तपासणी केली होती. त्यानंतर दि. ९ जून रोजी संगमनेर येथे त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर संगमनेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पत्नीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. चेतन काळे यांनी दिली. दरम्यान, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील १, विंचूर येथील २ आणि ओझर येथील १ अशा ४ जणांवर लासलगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
--------------------------
शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी
४रु ग्ण आढळलेला रहिवासी भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. तसेच निफाड येथे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वॉरण्टाइन करण्यासाठी शहरातील एक शाळा व लॉन्सचा क्वॉरण्टाइन सेंटर म्हणून वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी सुरू केली असून, आरोग्य विभागामार्फत शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी सांगितले.