नायगाव खोऱ्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 08:41 PM2020-09-03T20:41:01+5:302020-09-04T00:48:42+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात कोरोनाचा शिरकाव वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नायगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया गावांमध्ये कोरोना रुग्णांनी अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी नायगाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात कोरोनाचा शिरकाव वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नायगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया गावांमध्ये कोरोना रुग्णांनी अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी नायगाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नायगाव खो-यातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, सोनगिरी, जोगलटेंभी आदी गावांमध्ये विशेषत: गेल्या आठवडा भरापासून कोरोनाचा शिरकाव ब्राम्हणवाडे व नायगाव येथे झपाट्याने वाढु लागल्यामुळे खो-यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच गेल्या दोन दिवसात ब्राम्हणवाडे व नायगाव येथे नव्याने रुग्ण सापडत आहे. त्यामुळे खो-यातील गावांमध्ये सध्या चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
नायगाव हे पंचक्रोशीचे केंद्रबिंदू असल्यामुळे येथे जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावातील नागरिक येथे दैनंदिन कामांसाठी येत असतात. या गावांमध्येही रुग्ण सापडत असल्यामुळे नायगावकर धास्तावले आहे. त्यातच गुरूवारी एक सलून चालक ३६ वर्षीय तरूण पाँझिटीव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने शुक्रवार (दि.४) पासून पुढील चार सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बन यांनी दिली. यापुढे गावात विनाकारण फिरणारे व विनामास्क फिरणा-यांना पाचशे रूपये दंड करण्यात येणार असल्याचेही बन यांनी सांगितले.
नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाºया चिंचोली, मोह, बारागाव पिंप्री, पाट पिंप्री, सुळेवाडी, माळेगाव, कुंदेवाडी, भाटवाडी, लोणारवाडी, निमगाव सिन्नर व गुळवंच आदी गावांमध्ये आत्ता पर्यंत अडीचशे रुग्णांच्या पुढे गेला आहे. आरोग्य केंद्रा अंतर्गत आत्ता पर्यत सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.अनलाँक झाल्यापासून नागरिक सर्वत्र फिरत असतांना मास्क, सोशलडिस्टंसीग, विनाकारण न फिरणे आदी गोष्टी पाळतांना दिसत नाही. कोरोना संक्रमण सध्या याचमुळे वाढत आहे. नागरीकांनी अशा परस्थितीत लाँकडाऊन पेक्षाही अधिक सतर्क राहून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
- मनिषा वाघ, वैद्यकीय अधिकारी, नायगाव.