नामपुर शहरात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:33 PM2020-06-27T15:33:27+5:302020-06-27T15:35:01+5:30

नामपुर : येथील तीस वर्षीय युवकाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने मालेगाव येथे सामान्य रु ग्णालयात दाखल केले असता सदर युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित युवक काही दिवसापूर्वी मुंबईहून आल्याचे कळते आहे.

Corona infiltration in Nampur city | नामपुर शहरात कोरोनाचा शिरकाव

नामपुर शहरात कोरोनाचा शिरकाव

Next
ठळक मुद्देशहरात संसर्ग वाढण्याचा धोका टळला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नामपुर : येथील तीस वर्षीय युवकाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने मालेगाव येथे सामान्य रु ग्णालयात दाखल केले असता सदर युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित युवक काही दिवसापूर्वी मुंबईहून आल्याचे कळते आहे.
येथील ३० वर्षीय युवक मुंबई येथे महानगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात नोकरीस आहे. रविवारी (दि.२१) रोजी मुंबईहून नामपूर येथे सदर युवक आला होता. त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदर युवकाचा बुधवारी (दि.२३) रोजी स्वबचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवला असता शुक्र वारी (दि.२६) पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
नामपुर शहरात आरोग्य प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन गेल्या तीन महिन्यापासून मेहनत घेऊन शहराला कोरोना पासून दूर ठेवले होते. मात्र संबंधित कोरोनाग्रस्त युवकाने बेजबाबदारपणे मुंबई ते नामपूर असा प्रवास झाल्याने नामपुर शहरात पहिला कोरोना रु ग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नामपूर पासून दहा किलोमीटरवर असलेले कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले जायखेडा गावात कोरानाचे ५० हून अधिक पॉझिटिव्ह निघालेले रु ग्ण विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहेत. काही रु ग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. जायखेडा येथे वाढते रु ग्ण पाहता नामपूर येथे ग्रामपंचायत प्रशासनाने नामपुर शहरात शुक्र वारी (दि.१९) ते सोमवारी (दि.२२)असा जनता कर्फ्यू पाण्यात आला होता. या जनता कर्फ्यू काळात संबंधित कोरोनाग्रस्त युवक विलगीकरण केंद्रात दाखल झाला असल्याने शहरात संसर्ग वाढण्याचा धोका टळला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Corona infiltration in Nampur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.