नांदूरशिंगोटेत कोरोना तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:34+5:302021-05-23T04:13:34+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने प्रशासनाने कडक मोहीम राबविली. ग्रामपंचायत ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने प्रशासनाने कडक मोहीम राबविली. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या शिबिरात १५७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ४ जण बाधित आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने गावात कडक निर्बंध लागू केले आहेत. गावात विनामास्क फिरणाऱ्याची अँटिजन चाचणी अथवा दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना चाचणी करण्यात आली. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या आस्थापना सुरु ठेवण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दंवडी पिटवून सर्व व्यावसायिकांना व नागरिकांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले होते.
कोरोना तपासणी शिबिरात नावनोंदणी झाल्यानंतर तीन वाजेपर्यंत १५७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये चारजण बाधित आढळल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रामदास सानप, दीपक बर्के, ग्रामपंचायत सदस्य भारत दराडे, उत्तम बर्के, अनिल शेळके, निवृत्ती शेळके, सुदाम भाबड, अनिल पठारे, ग्रामविकास अधिकारी नीलेश हासे, विकास सूर्यवंशी, अरुण शेळके, तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव, दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ. लहू पाटील, राहुल हेंबाडे, एस. एस. कापरे आदींसह आशासेविका उपस्थित होत्या.