त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना जनजागृती चित्ररथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 09:04 PM2020-04-29T21:04:00+5:302020-04-29T23:34:41+5:30

त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ८५ गावे वाड्यापाड्यांमध्ये जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 Corona Janajagruti Chitrarath in Trimbakeshwar taluka! | त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना जनजागृती चित्ररथ !

त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना जनजागृती चित्ररथ !

Next

त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ८५ गावे वाड्यापाड्यांमध्ये जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी सभापती देवराम भस्मे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर. एस. पाटील, दगडू राठोड आदी उपस्थित होते. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून गावोगावी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजना चित्ररथातून रेकॉर्डिंगमधून सांगितल्या जाणार  आहेत.  खंबाळे, वाढोली, मुळेगाव, अंजनेरी, तळवाडे आदी गावांमधून कोरोना जनजागृती रथ फिरवण्यात आला आहे. येथील लोकांना ध्वनिक्षेपकावरून कोरोनाबाबत समज -गैरसमज कोरोना हा विषय लोक गांभीर्याने घेत नसून त्याचाच परिणाम जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विनाकारण घराबाहेर फिरू नका, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, हात स्वच्छ धुवा. सॅनिटायझरचा वापर करा, वगैरे सूचना करून जनजागृती केली.

Web Title:  Corona Janajagruti Chitrarath in Trimbakeshwar taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक