जिल्ह्यात कोरोनाने तब्बल १७ जणांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:43 AM2020-08-03T01:43:57+5:302020-08-03T01:44:31+5:30
नाशिक महानगरात रविवारी (दि.०२) १३, तर ग्रामीण भागातील चार अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १७ मृत्यूची नोंद झाल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ५२२ वर पोहोचली आहे.
नाशिक : महानगरात रविवारी (दि.०२) १३, तर ग्रामीण भागातील चार अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १७ मृत्यूची नोंद झाल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ५२२ वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी नवीन ५६६ रुग्ण बाधित आढळले असून, २२९ कोरोनामुक्त नागरिकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ५६६ नवीन रुग्ण बाधित आढळल्याने आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १५ हजार ५८५ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपा हद्दीतील १८१७, नाशिक ग्रामीणचे ४२३, डॉ. पवार मेडिकल कॉलेजचे ११५, जिल्हा रुग्णालयाचे ७९, मालेगाव मनपा रुग्णालये ७१, तर गृह विलगीकरणातील ९८५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
प्रलंबित अहवालांची संख्या ७८४
रविवारी दिवसभरात नवीन ८१९ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यातील ६१३ हे नाशिक मनपा हद्दीतील आहेत. नाशिक ग्रामीणचे ८८, जिल्हा रुग्णालयाचे १४, डॉ. पवार आडगाव मेडिकल कॉलेज १५, मालेगाव रुग्णालये २४ आणि विलगीकरणातील ६५ रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ७८४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे ११ हजार ५७३ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याने सध्या उपचार घेत असलेल्या नागरिकांची संख्या ३,४९० एवढीच आहे.